पुणे महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण तर्फे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन

हडपसर, दि. २० जून २०२०: हडपसर येथे दि. १९ जून २०२० रोजी सातव वाडी रोड परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. दरवर्षी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांच्या आगमनाच्या दिवशी वारकरी भक्तांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात येतो कोरूना विषाणू मुळे हडपसर मध्ये पालख्यांचे आगमन झाले नाही. परंतु वारकरी भक्तांच्या हस्ते महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले व दरवर्षीप्रमाने याही वर्षी वृक्षारोपण करण्यात आले.

या प्रसंगी विठुरायाचे लाडके वारकरी भक्त नगरसेवक मारुती आबा तुपे, नगरसेवक योगेश ससाणे, भूषण तुपे, सुनील बनकर व हम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच आयोजित निसर्ग वारी या संस्थेचे अध्यक्ष पर्यावरण तज्ञ प्रशांत अवचट, तसेच प्रकल्प समन्वयक राजेंद्र अनारसे व अन्य कार्यकर्ते तसेच पर्यावरण प्रेमी नागरिक उपस्थित होते.

हा कार्यक्रम पूर्णपणे सोशल डिस्टंसिंग ठेवून व सर्व नियम पाळून करण्यात आला व मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा