पुणे- नगर मार्गावरील वाहतूक १ जानेवारीला बंद

42

पुणे : कोरेगाव भिमा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी १ जानेवारीला लाखो नागरिक येथे दर्शनासाठी येतात. पुणे – नगर मार्गावरील पेरणे फाटा येथे होणाऱ्या गर्दीमुळे संभाव्य वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराकडून नगर रस्तामार्गे नगरकडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी ३१ डिसेंबरच्या रात्री ९ वाजेपासून ते १ जानेवारीच्या रात्री १२ वाजेपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करावा.

पर्यायी मार्ग पहिला : पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमार्गे नगरकडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी (पेरणे फाट्याकडे जाणाऱ्या वाहनांखेरीज) नगर रस्त्यावरील खराडी बायपास चौकातून हडपसर- सोलापूर रोड- केडगाव- चौफुलामार्गे-न्हावरा-शिरुरमार्गे नगरकडे जावे. तर येरवडा-विश्रांतवाडी-आळंदी-मरकळमार्गे शेल पिंपळगाव-शिक्रापूर-नगरकडे जावे.

पर्यायी मार्ग दुसरा : सासवड, कात्रज बायपासकडून येणाऱ्या सर्व वाहनांनी हडपसर गाडीतळ पुलाखालून उजवीकडे वळून सोलापूर रस्त्याने मांजरी फाटा-लक्ष्मी कॉलनी (१५ नंबर) चौकाकडे जावे. तर पुणे-सातारा मार्गाकडून येणाऱ्या वाहनांना हडपसर येथून सोलापूर महामार्गाद्वारे चौफुलामार्गे न्हावरा-शिरुरमार्गे नगरकडे जावे.

या वाहनांना सवलत : अग्निशमन दल, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्‍यक वाहनांना मात्र या मार्गावरुन सवलत देण्यात आली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा