पुणे – सोलापूर रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू

उरुळी कांचन, ७ ऑगस्ट २०२०: भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात वाहनाच्या धडकेत पाई चालत जाणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला. पुणे – सोलापूर रोडवर सोरतापवाडी गावच्या हद्दीत श्रीनाथ नर्सरीच्या समोर हा अपघात घडला आहे.

मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीची ओळख अद्याप तरी झालेली नसून व अनोळखी व्यक्ती यांचे अंदाजे वय ३५ वर्ष नाव व पत्ता अद्याप तरी समजला नसून व पुणे सोलापूर रोडने पायी चालत जात असताना त्यास आज दि. ७ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी वेळ अंदाजे ६:३० वाजण्याच्या सुमारास सोरतापवाडी गावच्या हद्दीत श्रीनाथ नर्सरी समोर अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकांनी सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे निष्काळजीपणाने भरधाव वेगात वाहन चालवत घेऊन जात असताना अज्ञात वाहनाने व्यक्तीला जोरात धडक देऊन अपघात करून अपघातात अज्ञात व्यक्तीच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली व त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

अज्ञात वाहन चालक त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाला व अपघाताची खबर न देता पळून गेला आहे. अज्ञात वाहनावरील चालक विरुद्ध लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे लोणी काळभोर पोलिसांनी सांगितले आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलिस स्टेशन करत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा