शहरात पीएमपी बसमधील महिला प्रवाशांना टार्गेट करत चोरट्यांनी १ लाख ३० हजार रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. गेल्या दोन दिवसांत पुणे महापालिका भवन आणि वाकडेवाडी येथील बस थांब्यांवर या घटना घडल्या. महापालिका भवन येथे एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ८० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र गर्दीचा फायदा घेऊन चोरण्यात आले.
दुसरी घटना वाकडेवाडी येथे घडली, जिथे एका महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपयांचे मंगळसूत्र लंपास झाले. या दोन्ही घटनांमध्ये शिवाजीनगर आणि खडकी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर, चंदननगरमध्येही दुचाकीस्वार चोरट्यांनी एका महिलेचे १ लाख २० हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले आहे. या वाढत्या घटनांमुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले












































