पुणे, २२ डिसेंबर २०२३ : पुणे पोलीस आयोजीत तरंग २०२३ या कार्यक्रमाचे शिवाजीनगर मुख्यालयाच्या ग्रांउडवर शुक्रवारी मोठ्या थाटात उदघाटन करण्यात आले. ‘तरंग’ उत्सव मैत्रीचा, अशी या महोत्सवाची टॅगलाईन असुन नागरिकांसाठी या महोत्सवात महाराष्ट्राची संस्कृती, कला अविष्कार, पाककला, स्थानिक लोककला अशा गोष्टींची मेजवानी असणार आहे. महोत्सवाची वेळ सकाळी ११ ते रात्री १० पर्यंतची असून २४ डिसेंबरला या महोत्सवाची सांगता होणार आहे.
विविध कार्यक्रमांमध्ये पोलिसांचे शीघ्र कृती दल मॉक ड्रिल, बीट मार्शल आणि दामिनी पथकांची ओळख भेट तसेच गार्ड ऑफ ऑनर समारंभ, पोलीस बँड, पोलिसांच्या विभागनिहाय कामांची माहिती देणारा कार्यक्रम आणि डॉग स्क्वाड शो होणार आहे. यासोबतच मराठी कलाकारांची भेट, ऑर्केस्ट्रा, खाद्य संस्कृतीची ओळख आणि महोत्सव बाजार असेही उपक्रम या तीन दिवसीय तरंग महोत्सवात होत आहेत. सहपरिवार या महोत्सवाला आपण हजेरी लावावी असे आवाहन पुणे पोलिसांनी नागरिकांना केलं आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : वैभव वाईकर