पुणे शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असताना, आता थेट पोलिस अधिकाऱ्यांनाच धमकी देण्याचे प्रकार समोर येत आहेत. खराडी येथील दोन सख्या भावांनी चंदननगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ महिला पोलिस निरीक्षकाला धमकी दिली. आरोपींची नावे आहेत योगेश आणि महेश भालेराव.
या प्रकरणात, रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली अंडाभुर्जीची गाडी बंद करायला सांगितल्याने आरोपींनी पोलिस अधिकाऱ्याची वर्दी पकडून “तुम्ही काय करणार, बघून घेईन तुम्हाला” अशी धमकी दिली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर, आरोपींनी “तुमची नोकरी घालवतो” अशी धमकी दिली. या घटनेनंतर दोघांवर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – चंद्रशेखर रहांगडाले












































