पुणे रेल्वे स्थानकावर आता १२ फलाट; प्रवाशांसाठी मोठा दिलासा!

पुणे रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुणे रेल्वे स्थानकावर सहा नवीन फलाट बांधण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्या असलेल्या सहा फलाटांमध्ये नव्या सहा फलाटांची भर पडल्याने, पुणे स्थानकावर एकूण १२ फलाट उपलब्ध होणार आहेत. या नव्या सुविधेमुळे गाड्यांची संख्या वाढवता येईल आणि प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा मिळणार आहे.

रेल्वे बोर्डाने फलाट क्रमांक ७ आणि ८ साठी मंजुरी दिली असून उर्वरित चार फलाटांना लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या फलाटांमुळे गाड्यांचे वेळापत्रक पाळणे सोपे होईल, गर्दीचे विभाजन होईल आणि प्रवाशांचा वेळही वाचणार आहे. पुणेकरांसाठी ही सुविधा मोठा दिलासा ठरणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे