वाघोली परिसरातील झपाट्याने वाढणाऱ्या शहरीकरणामुळे आणि एक लाखांहून अधिक वीज ग्राहकांच्या वाढत्या संख्येमुळे महावितरणने मोठा निर्णय घेतला आहे. वाघोली शाखेचे विभाजन करून चार नवीन शाखांची निर्मिती करण्यात आली आहे.
➡️ वाघोली
➡️ वाघोली (विठ्ठलवाडी)
➡️ साई सत्यम
➡️ लोणीकंद
या शाखांचे लोकार्पण आमदार ज्ञानेश्वर कटके आणि महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांच्या हस्ते पार पडले.
या निर्णयामुळे ग्राहकांना वीजपुरवठा आणि सेवा अधिक सुलभतेने उपलब्ध होणार आहेत. यासोबतच महावितरणच्या मनुष्यबळात वाढ होऊन ५१ अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी तत्काळ सोडवणे आणि वीजपुरवठा सुरळीत ठेवणे अधिक सोपे होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – चैतन्य पगारे










































