पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट!

पुणेकरांसाठी पाणीपुरवठ्याबाबत चिंताजनक बातमी समोर आली आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पुणे महापालिकेने २०२५-२६ या वर्षासाठी २१ टीएमसी पाण्याची मागणी केली होती. मात्र, पाटबंधारे विभागाने केवळ १४.६१ टीएमसी पाणी मंजूर केले आहे. त्यामुळे पुढील काळात पुणेकरांना पाणी कपातीच्या संकटाचा सामना करावा लागू शकतो.

गेल्या वर्षी महापालिकेने तब्बल २२ टीएमसी पाणी वापरल्याचा दावा केला होता. यामध्ये खडकवासला धरणातून १९.७५ टीएमसी पाणी वापरण्यात आले होते. यंदा मंजूर झालेल्या कमी पाण्यामुळे महापालिकेला पाणी व्यवस्थापनासाठी अधिक काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.

यामुळे नागरिकांमध्ये मोठी चिंता व्यक्त होत असून, वर्षभर पुरेसे पाणी मिळेल का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता महापालिकेची पाणी बचत आणि नियोजन क्षमता कसोटीला लागणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे