पुण्यात होणाऱ्या पाणी कपातीचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कसा होणार पाणीपुरवठा

पुणे, 2 जुलै 2022: यंदा मान्सून उशिरा आल्यामुळं धरणातील उपयुक्त पाणीसाठा कमी झालेला दिसतोय. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणीसाठा अतिशय कमी झाल्यामुळं महानगरपालिकेने पाणी कपातीचा निर्णय घेतलाय. 4 जुलैपासून ही पाणी कपात सुरू होणार आहे. तर 11 जुलै पर्यंत ही कपात सुरू राहणार आहे. शहरातील विविध भागात दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे. यानुसार महानगरपालिकेने परिसरानुसार विभागणी केली आहे.

महापालिका प्रशासनाने आठवडाभरासाठी केलेल्या वेळापत्रकामध्ये 4, 6, 8 आणि 10 जुलै; तसेच 5, 7, 9 आणि 11 अशा चार-चार दिवसांचं वेळापत्रक तयार करण्यात आलं आहे. शहरात पाणी पुरवठ्यासाठीचे सहा झोन आहेत. या सहा झोनमध्ये असलेल्या पाण्याच्या टाक्यावरून त्या त्या परिसरातील पाणीपुरवठा विभागण्यात आलाय.

उदाहरणार्थ

चतुर्श्रुंगी टाकी क्रमांक 1 ते 3- औंध आयटीआय रोड, सकाळ नगर चव्हाण नगर नॅशनल सोसायटी, अभिमान श्री सोसायटी, आनंद पार्क काही भाग, सानेवाडी काही भाग, औंध बाणेर फाटा ते महाबळेश्वर हॉटेल पर्यंत, मुरकुटे वस्ती पार्ट, विधाते वस्ती पार्ट, आंबेडकर नगर, डी पी रोड, मेन पॉइंट, हॉस्पिटल परिहार चौक, आनंद पार्क, सानेवाडी, औंध गाव, रोहन निलय उजवीकडील सर्व भाग, स्पायसर कॉलेज पर्यंत अर्मामेंट कॉलनी या भागांसाठी 4, 6, 8 आणि 10 जुलै तारीख ठरवण्यात आली आहे.

चतुर्श्रुंगी टाकी 1 – बोपोडी परिसर, आंबेडकर चौक ते बोपोडी व खडकी स्टेशन रेल्वे स्टेशन पर्यंत, बोपोडी गावठाण भाऊ पाटील रोड, औंध रोड, पुणे मुंबई जुना रस्ता, भोईटे वस्ती सोसायटी, किर्लोस्कर ऑइल इंजिन लिमिटेड कंपनी व त्या समोरील भाग, पुणे विद्यापीठ या भागांसाठी 5, 7, 9 आणि 11 तारीख ठरवण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा