पुणे : ठाकरे सरकार राज्यात कोरोनाच्या उपचारावर योग्य नियोजन करत आहे. सध्या पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे.परंतु ही संख्या जर वाढतच गेली तर हे रुग्णालय पुरेसे पडणार नाही. या दृष्टीने पुण्यातील ससून रुग्णालयात राज्यातील पहिले कोरोना रुग्णालय सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकार विचार करीत आहे. त्यासाठी ससून रुग्णालयाची नवी ११ मजली इमारत कोरोनाबाधित रुग्णांसाठी तयार करण्यात येत आहे.अशी माहिती मिळत आहे.
यात पुणे शहरात १८, पिंपरी चिंचवडमध्ये १२, आणि राज्यतील इतर ठिकाणी मिळून कोरोना बाधितांचा आकडा १३० वर पोहचला आहे. हि आकडेवारी पाहता खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकार ससून रुग्णालयाची ही इमारत केवळ कोरोना रुग्णांसाठी तयार करण्यात येत आहे.
यात दिलासादायक बाब अशी की, काही कोरोनाबाधित रुग्णांची पुन्हा चाचणी केली असता त्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे. हे रुग्णालय झाले तर रुग्णांना तपासणी करण सोपं जाणार आहे.