गोल पोस्ट राजकारण पंजाब भाजपचे माजी अध्यक्ष यांचे निधन

पंजाब भाजपचे माजी अध्यक्ष यांचे निधन

पंजाब: भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष कमल शर्मा यांचे आज सकाळी फिरोजपूर जिल्ह्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शर्मा यांच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की, शर्मा (४८) यांना सकाळी फिरायला जाताना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शर्मा यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. आपल्या मृत्यूच्या दोन तासांपूर्वी शर्मा यांनी ट्विटरवरून लोकांना दिवाळीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

error: Content is protected !!
Exit mobile version