दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

पंजाब, १३ ऑक्टोबर २०२२: पंजाब सरकारने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर एक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, दिवाळी मध्ये फटाके फोडण्याच्या वेळा निश्चित केल्या आहेत. पंजाबच्या भगवंत मान सरकारने दिवाळीच्या रात्री फक्त दोन तासच फटाके फोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंजाबचे मंत्री गुरमीत सिंग मीत हैर यांनी तसे आदेश दिले असून, दिवाळी रात्री ८ ते १० या दोन तासांसाठीच फटाके फोडण्यास परवानगी असणार आहे.

केवळ ग्रीन फटाक्यांना परवानगी

यासोबतच पंजाब सरकारने राज्यात फक्त ग्रीन फटाके उडवण्यास परवानगी दिली आहे. याबाबत पंजाब सरकारच्या पर्यावरण विज्ञान तंत्रज्ञान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या होत्या.

प्रकाश पर्वासाठी फटाक्यांची वेळ निश्चित

यासोबतच दिवाळी व्यतिरिक्त श्रीगुरु नानक दिनी म्हणजेच आठ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ ते ५ आणि सकाळी ९ ते १० या वेळेत फटाके वाजवण्याची परवानगी असणार आहे.

ख्रिसमस आणि नवीन वर्षाचाही निर्णय

त्याचबरोबर ख्रिसमसच्या निमित्ताने २५ व २६ डिसेंबर रोजी सकाळी ११.५५ ते दुपारी १२.३० या वेळेत ३५ मिनिटे आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येला ३१ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत रात्री ११.५५ ते १२.३० वाजेपर्यंत फटाके फोडण्यास परवानगी असणार आहे.

दरम्यान, पंजाबमध्ये फटाक्यांची निर्मिती, साठा, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी आहे. राज्यात केवळ बेरियम क्षार किंवा अँटीमोनी, लिथियम, पारा आर्सेनिक, स्ट्रॉन्शिअम, क्रोमेट या संयुगांपासून तयार न केलेले ग्रीन फटाके विकले जातील. फटाक्यांची विक्री केवळ परवानाधारक व्यापाऱ्यांमार्फतच केली जाणार असून परवानाधारक व्यापाऱ्यांनी ग्रीन फटाक्यांव्यतिरिक्त विषारी रसायनयुक्त फटाके विकले जाणार नाहीत याचीही काळजी घेतली जाईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा