सोलापूर, ३० डिसेंबर २०२०: कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कपात केलेल्या परीक्षा शुल्काच्या अंमलबजावणी बाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सोलापूरच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला दिनांक २९ डिसेंबर २०२० रोजी स्मरण पत्र देण्यात आले.
संपूर्ण जग हे कोविड १९ ह्या महामारीने त्रस्त झाले आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने शेवटच्या वर्षाच्या परीक्षा सोडून सर्वच परीक्षा रद्द केलेल्या होत्या. तरीदेखील आपल्या विद्यापीठाने परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांवर लादली. दिनांक २७ ऑगस्ट २०२० रोजीच्या प्रशासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांनी भरलेल्या एकूण परिक्षाशुल्क पैक्की १९.२६ एवढी रक्कम शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या पहिल्या सत्र परीक्षा शुल्कामध्ये समायोजित करण्याचा विचार करण्यात आला आहे. अशा आशयाचे पत्र त्यावेळी दिले होते पण त्याची पूर्तता झालेली दिसत नाही.
महाविद्यालय चालू नसताना विद्यापीठ विद्यार्थ्यांकडून जिमखाना फी, डेव्हलपमेंट फी, लॅबररी फी, युवा महोउत्सव फी अश्या प्रकारच्या अनेक फी आकारत आहे. म्हणजे फी माफीचं पत्र काढूनही माफ करायचं नाही. परंतु ज्यांची सुविधा विद्यार्थी सध्या घेत नाही ती फी मात्र आकारायची अशा प्रकारचा कारभार म्हणजे “आंधळा मागतो आणि देव देतो.” इथे विद्यापीठ अधिकाऱ्यांची भूमिका घेत विद्यार्थ्यांकडून आर्थिक लूट करत आहे.
कृपया आपण विद्यार्थी हित लक्षात घेऊन आपण जी १९.२६% फी कपात करण्याचे परिपत्रक काढली होती, त्यावर अंमलबजावणी करावी. अन्यथा विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असे स्मरण पत्र अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सोलापूर महानगर मंत्री अनिकेत प्रधाने यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास दिले.
न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड