पुण्यात १५ डिसेंबरला शाळा सुरु होणार, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पुणे, १ डिसेंबर २०२१ : राज्यात १ डिसेंबर पासून म्हणजेच आज पासून पहिली ते चौथी पर्यंत शाळा सुरू होणार आहे. म्हणजेच पहिली ते बारावी असे वर्ग सुरू होणार आहेत. या आधीपासून पाचवीच्या वरचे वर्ग सुरू करण्यात आले होते. राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी कोरोना चा नवीन व्हेरीएंट जगभरात पसरताना दिसतोय. त्यात पुण्यातही आफ्रिके करून आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे महानगरपालिकेने पुण्यातील शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत माहिती दिली. शाळा सुरु करण्यासंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या बैठक झाली. या बैठकीत पुण्यातील शाळा १५ डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ओमिक्रॉन विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात तीन दिवसांसाठी निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे पुण्यातील शाळा १५ डिसेंबर पर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे.

मुरलीधर मोहोळ म्हणाले की, पुढे देखील शाळा सुरू करताना पालकांसोबत किंवा वेगवेगळ्या संघटना, टास्क फोर्स इत्यादींशी चर्चा करूनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. पुण्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण झालं असलं तरी लहान मुलांना अजूनही लस दिली गेली नाही, असंही त्यांनी नमूद केलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा