पुण्यात कोरोनाच्या लढ्यासाठी भाजपचे लोकप्रतिनिधी चौकीदार होणार

पुणे, दि.२ मे २०२०: पुणे शहरातील कोरोनाचा संकट दिवसेंदिवस वाढत आहे. हे संकट आटोक्यात आणण्यासाठी आता पुण्यातील भाजपचे १०० नगरसेवक, ६ आमदार, व खासदार चौकीदार म्हणून काम करणार आहे, अशी माहिती खासदार गिरीश बापट यांनी मंगळवारी (दि.२) पत्रकारांशी बोलताना दिली.

या बैठकीला खासदार गिरीश बापट, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तपकिर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, शहर सरचिटणीस राजेश येनपुरे, राजेश पांडे यांनी मनपा आयुक्त कार्यालयात कोरोना नियंत्रित करण्यासाठी नियुक्त केलेल्या चार आयएएस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे बापट यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पत्रकारांशी बोलताना बापट पुढे म्हणाले की, या ४ आयएएस अधिकाऱ्यांना शहरातील वेगवेगळे भाग वाटून देण्यात आले आहेत. त्यांच्यामध्ये सुसूत्रीकरण व्हावे. यासाठी आमचे असंख्य कार्यकर्ते काम करायला तयार आहेत. आम्ही आता पर्यंत लाखो लोकांना जेवण, अन्नधान्य, भाजीपाला, दूध वाटप करण्याचे काम केले. तसेच कोरोनाच्या टेस्टिंग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने संख्या वाढत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत. मात्र, पुणेकरांनी घाबरून जाऊ नये, असेही बापट यांनी यावेळी सांगितले.

सध्या जास्तीत जास्त कोरोनाच्या टेस्ट करणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या बाहेर येणे गरजेचे आहे. त्यामुळे आगामी काळात कोरोनाला रोखण्यासाठी भाजपचे १०० नगरसेवक, आमदार, खासदार चौकीदार म्हणून काम करणार आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी आणखी पुढे जायचे आहे. ही बैठक यशस्वी झाली. पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांशी मी संपर्कात आहे. १६२ वार्डात हा पॅटर्न राबविण्यात येणार आहे.

जनतेच्या हिताचे काम व्हावे. प्रशासनाने सातत्याने लोकप्रतिनिधींच्या संपर्कात असले पाहिजे, अशी अपेक्षाही बापट यांनी व्यक्त केली.

न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा