पुणे: येथील अमनोरा टाऊनशिपच्या गेटवे टॉवर या इमारतीच्या शिखरावर रविवारी (ता२६) प्रजासत्ताक दिनी जमिनीपासून सुमारे ५५० फूट उंचीवर तिरंगा ध्वज फडकवण्यात आला आहे. देशातील कोणत्याही मोठ्या शहरातील बहुमजली उंच इमारतीवर अशा प्रकारचा तिरंगा ध्वज पहिल्यांदाच फडकविण्यात आला आहे.
हडपसर उपनगरात असलेल्या अमनोरा टाऊनशीपमधील ४५ मजली गेटवे टॉवरच्या शिखरावरील छतावर राष्ट्रध्वज फडकवण्यात आला आहे. शेवटच्या मजल्यावर ३० फूट उंचीच्या पोलवर ३० बाय २० फूट एवढ्या आकाराचा तिरंगा फडकविण्यात आला आहे. शहराचे हे नवे आकर्षण ठरले आहे.
याबाबत सिटी कार्पोरेशनचे उपाध्यक्ष सुनील तरटे म्हणाले, “सिटी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांची ही मूळ कल्पना आहे.
गेटवे टॉवरच्या ४५ व्या मजल्यावर ३० फूट उंचीचा लोखंडी खांब लावण्यात आला आहे. त्यावर हा तिरंगा फडकविण्यात आला आहे. २६ जानेवारीला सकाळी त्याचे ध्वजारोहण केले गेले. सर्वात उंचीवर देशाचा राष्ट्रध्वज फडाकावताना मोठा अभिमान वाटत आहे.”