पुणे जिल्ह्यात एकुण ४८१ रिलीफ कॅम्प

पुणे, दि. २ मे २०२० : सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत १५८ कॅम्प, कामगार विभागामार्फत ६८ कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत २५५ कॅम्प असे विभागात एकुण ४८१ रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत.

त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देता तात्काळ उपाययोजना आखणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचने अन्वये विस्थापित आदिवासी नागरिकांच्या प्रवासाकरीता आदेश निर्गमित केले आहेत.

या आदेशानुसार सदर व्यक्तींची प्रवास व्यवस्था व त्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच अधिकारी, कर्मचा-यांची आपत्ती व्यवस्थापन कायद्या अन्वये नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा