पुण्यातील डुकरे पकडण्यासाठी महापालिकेचे सीमोल्लंघन

पुणे : पुणे शहरामध्ये कोट्यवधींचा खर्च करुनही शहरातील डुकरांची समस्या काय सुटण्याचं नाव घेत नाहीये. त्यात डुकरांमुळे हतबल झालेल्या महापालिका प्रशासनाने आता सीमोल्लंघन करण्याचा निर्णय घेतला आहे. डुकरांना पकडण्यासाठी कर्नाटकातील ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली आहे.अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

पुणे शहरात डुकरांच्या उपद्रवाने हैराण झालेल्या महापालिका प्रशासनाने त्यासाठी एक भन्नाट योजना आणली आहे. नियुक्ती केलेला हा ठेकेदार पकडलेली डुकरे तिकडे घेऊन जाणार आहे. त्यासाठी त्याने पोलिस संरक्षणाची मागणीही केली आहे. प्रशासनाकडून मोकाट डुकरे पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. मात्र, तरीही डुकरांची संख्या अटोक्यात राहिलेली नाही. डुकरांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. अशा प्रकारच्या असंख्य तक्रारी रहिवाशांनी महापालिकेकडे नोंदवल्या आहेत. एप्रिल ते नोव्हेंबर २०१९ या काही महिन्यामध्ये डुकरे पकडण्यासाठी सुमारे २ कोटी १३ लाख खर्च आला आहे.

ही डुकरे पकडण्यासाठी स्थानिक ठेकेदाराच्या कामाचा काही उवयोग होत नसल्याने पालिका प्रशासनाने सीमोल्लंघन करण्याचा निर्णय घेतला. तसेच या बाहेरून आयात केलेल्या ठेकेदाराला जास्तीची रक्कमही देऊ केली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा