पुणे, दि. ५ जून २०२०: सुमारे ९,००० एकर वनजमीन असून, शहरीकरणामुळे आता हे भाग शहराच्या ऐन मध्यवर्ती भागात आले आहेत. वारजे शहरी वनक्षेत्र हा अतिक्रमणाच्या सावटाखाली असणारा असाच एक भाग होता. २०१५ साली, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यापासून प्रेरणा घेत, वारजेला पर्यावरण आणि परिसंस्थेच्या दृष्टीने एक ‘हरितस्थळ’ म्हणून रूपांतरित करण्याचा अग्रणी उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. आज सुमारे १,००० लोक इथे दररोज भेट देतात.
आज जैववैविध्याने युक्त वारजे शहरी वनक्षेत्रात, वनस्पतींच्या २३, पक्ष्यांच्या २९, फुलपाखरांच्या १५, सरपटणाऱ्या १० आणि सस्तन प्राण्यांच्या ३ प्रजाती आहेत. शहरी भागात वनक्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी, याच उदाहरणाचे अनुकरण भारतभरात सर्वत्र केले जाऊ शकते. ओसाड भूमीवर नंदनवन विकसित करण्याच्या या महत्वाकांक्षी उपक्रमाचा भाग म्हणून, केंद्र सरकारने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्बन फॉरेस्ट हा प्रकल्प सुरु केला.
PPP भागीदारीतून हे ‘स्मृतीवन’ अस्तित्वात आले आहे. २०१५ ते २०१७ या काळात वारजे इथं सुमारे ९,५०० झाडं लावली गेली जी आता २० ते ३० फूट उंच वाढली आहेत. अनेकांनी आपल्या प्रियजनांच्या स्मृतिनिमित्त झाडं लावली आणि दत्तक घेतली. पुण्यातील वारजे शहरी वनक्षेत्र, दरवर्षी १.२९ लाख किलो कार्बन डाय-ऑक्साइड शोषून घेते. तर ५.६२ लाख किलो ऑक्सिजनची म्हणजे प्राणवायूची निर्मितीही करते.
पुण्यातील वारजे शहरी वनक्षेत्र, परिसंस्थेचा समतोल राखण्याबरोबरच सामाजिक विकासासाठीही मदत करते. येणाऱ्या पिढ्यांच्या दृष्टीने, हे एका योग्य दिशेने उचललेले पाऊल आहे. अर्बन फॉरेस्ट शहराची फुफ्फुसे असतात. वारजे नगर वन पुणेकरांना स्वच्छ हवा देते. हवामान बदलाचा सामना करण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी