पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी केले मतदान

पुरंदर, १ डिसेंबर २०२०: राज्यामध्ये विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक पार पडते आहे. पुरंदरचे आमदार आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांनी आज सकाळी सासवड येथील पुरंदर हायस्कूल मध्ये असलेल्या मतदान केंद्रात जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. या वेळी त्यांनी पदवीधरांना व शिक्षकांना १०० टक्के मतदान करण्याचं आवाहन केलंय.

कोरोनामुळं सामाजिक अंतर पाळत कराव्या लागणाऱ्या सर्व चाचण्या घेऊन, आमदार संजय जगताप यांनी मतदान केलं. जगताप हे मतदान केंद्रावर आल्या नंतर आरोग्य सेवकां मार्फत त्यांच्या शरीराचं तापमान मोजण्यात आलं. त्याचबरोबर पल्स ऑक्सिजन लेवल तपासण्यात आलं. यानंतर आमदार संजय जगताप यांनी मतदान केंद्रात जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. आमदार जगताप यांनी मतदान केंद्रातून बाहेर आल्यानंतर आपण मतदान केल्याचं हात उंचावून माध्यम प्रतिनिधींना सांगितलं.

यावेळी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या या मंदिरात आपली सेवा बजवावी असं आवाहन त्यांनी पदवीधर व शिक्षक मतदारांना केलं आहे. लोकशाहीमध्ये उच्चशिक्षित लोक राज्यकारभारात असावेत म्हणून शिक्षक व पदवीधर मतदार संघ निर्माण करण्यात आलेले आहेत आणि म्हणूनच या शिकलेल्या मंडळींनी मतदानमध्ये सहभाग घेऊन शंभर टक्के मतदान करावं असं आवाहन आमदार संजय जगताप यांनी यावेळी केलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा