पुरंदर तालुका झाला कोरोनामुक्त

पुरंदर दि.१२ मे २०२०: पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे सापडेला कोरोना रूग्णाची दुसरी चाचणी निगेटीव्ह आल्याने पुरंदरकरांनी आनंद व्यक्त केला आहे. त्याचबरोबर आता तालुक्यात एकही कोरोना रूग्ण नसल्याचे अधोरेखित झाले आहे. या रूग्णाला आता कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहीती पुरंदरच्या तहसीलदारांनी दिली आहे.

जेजूरी येथील देव संस्थानच्या डायलिसिस सेंटरमध्ये काम करणारा टेक्नीशियन कोरोना पाॅझिटीव्ह असल्याचे तपासणी अंती अढळून आले होते. मात्र आज दुसऱ्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यानंतर या रूग्णाला रूग्णालयातून कोविड केअर सेंटरमध्ये हलवण्यात येणार आहे. पुढील चौदा दिवस त्याला कोविड केअर सेंटरमध्येच ठेवण्यात येणार आहे. तर या रूग्णाच्या संपर्कातील कोवीड केअर सेंटरमध्ये ठेवलेल्या २४ लोकांना दुपारीच घरी सोडण्यात आले आहे. देव संस्थानच्या कार्यालयाबाहेर त्याचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.

दरम्यान रूग्ण निगेटीव्ह निघाला असला तरी पुढील आदेश येईपर्यंत जेजूरी परिसरातील झोनमध्ये कोणतेही फेरबदल करण्यात येणार नसल्याचे तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे जेजूरीकर नागरीकांना लाॅकडाऊन मधून सध्यातरी कोणतीही सवलत मिळणार नाही असेच दिसते.

न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा