आपल्या पैकी बऱ्याच जणांना असा प्रश्न पडत असेल की श्रीमंत लोकांकडे का पैसा जातो. असं काय करत असतील बरं ते की कुठं ही ८ तास १२ तास न राबता हे सहज पैसा कमवतात. तर दुसऱ्या बाजूला आपल्या सारखे सामान्य आयुष्यभर कष्ट करून जेम तेम एक घर घेण्या इतकाच कमावू शकतात. पूर्ण आयुष्य कर्जाचे हप्ते फेडण्यात जाते. तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत एका पुस्तकात होय एका पुस्तकात. ते पुस्तक आहे रिच डॅड पुअर डॅड. रॉबर्ट कियोसाकी यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. चला तर मग आज या प्रश्नांची उत्तरं या पुस्तकातून शोधुयात.
रॉबर्ट कियोसाकी यांनी या पुस्तकात दोन व्यक्ती मत्वांची तुलना केली आहे. एक म्हणजे त्यांचे वडील आणि दुसरे म्हणजे त्यांच्या मित्राचे वडील. या दोघांचे विचार कसे भिन्न आहेत आणि त्याच्या आर्थिक आयुष्यावर काय परिणाम होतो त्याचे रेखाटन त्यांनी अतिशय योग्य पद्धतीने केले आहे आणि या नियमांचा वापर करून ते कसे श्रीमंत झाले त्याचे वर्णन यात केले आहे.
रॉबर्ट कियोसाकी म्हणायचे की त्यांचे दोन वडील होते एक गरीब आणि एक श्रीमंत. त्यातले एक उच्च शिक्षित आणि त्यांनी पी एच डी सुद्धा केली होती तर दुसऱ्या वडिलांनी त्यांचे शिक्षण सुद्धा पूर्ण केले नवते. दोघे ही आप आपल्या क्षेत्रात यशस्वी होते परंतु एक पैश्यासाठी तडजोड करत होते तर दुसरे त्या शहरातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते. जेव्हा ते पैश्या विषयी बोलत तेव्हा दोघांचे विचार वेगवेगळे असायचे. त्यातल्या एकाचे म्हणणे होते की पैश्याविषयी आकर्षणच सर्व समस्यांचे कारण आहे तर दुसऱ्याचे म्हणणे होते की पैश्यांचा अभाव हेच सर्व समस्यांचे कारण आहे.
रॉबर्ट कियोसाकी यांना त्यांच्या लहानपणी प्रश्न पडत असे की नेमकं ऐकायचं कोणाचं, कारण पैष्याविषयी दोघांचे विचार भिन्न होते. त्यांचे एक वडील त्यांना नेहमी म्हणायचे की आपण हे घेऊ नाही शकत आपण ते घेऊ नाही शकत, पण त्यांचे दुसरे वडील असे शब्द कधीच वापरत नसे. याउलट त्यांनी रॉबर्ट ला सुद्धा असे शब्द वापरण्यास मनाई केली होती. ते समजावून सांगायचे की तू स्वतःला विचार की तू ती वस्तू कशी घेऊ शकतो. त्यांचे म्हणणे होते की जेव्हा तू स्वतःला म्हणतो की मी हे घेऊ नाही शकत ते घेऊ नाही शकत तेव्हा तुझ डोकं चालणं बंद होत पण जेव्हा तू स्वतःला असं विचारतो की तू कशी ती वस्तू मिळवू शकतो तर तुझे डोक ती वस्तू मिळवण्यासाठी काम करण्यास सुरवत करत. त्यांचे म्हणणे असे नवते की तुम्ही प्रत्येक गोष्ट विकत घेत चला त्यांचं म्हणणं असं होत की तुम्ही तुमचं डोकं अॅक्टिव ठेवा त्याला कामाला लावा जेणेकरून त्याचा सराव होत राहील आणि दिवसेंदिवस ते आणखी तल्लख बनत जाईल.
त्यांचे एक वडील म्हणायचे की रिस्क घेण्यापासून लांब रहा तर याउलट त्यांचे दुसरे वडील म्हणायचे की रिस्क मनेज करायला शीक. त्यांचे एक वडील म्हणायचे की चांगलं शिक्षण घे चांगली कॉलेज डिग्री घे आणि एक सेफ आणि सेक्युर नोकरी कर तर दुसरे वडील म्हणायचे की शिक्षण घे आणि पैसा कसा काम करतो हे समजून घे, पैश्यासाठी काम नको करू तर पैशाला तुझ्यासाठी कामाला लाव.
त्यांनी ९ वर्षाचे असताना ठरवले की ते त्यांच्या रीच म्हणजे श्रीमंत वडलांचे ऐकणार आणि पैसे कसे कमवावे याच त्यांच्याकडून शिक्षण घेणार आणि पैसे कमावण्या च्या बाबतीत त्यांच्या गरीब आणि उच्च शिक्षित वडलांच ऐकन बंद करणार. वास्तवात त्यांचे गरीब वडील हेच त्यांचे खरे वडील होते जे खूप शिक्षित होते आणि शिक्षकाची नोकरी करत होते. परंतु असे असूनही ते गरीब होते. पण ज्यांना ते रिच डॅड म्हणायचे ते त्यांचा मित्र माईक चे वडील होते ते त्यांच्याकडे पैसे कसे कमवावे यासाठी जात होते. या रिच डॅड नी त्यांचे शिक्षण सुद्धा पूर्ण केले नवते तरी ते त्या शहरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. माईक आणि रॉबर्ट यांच्या सांगण्यावरून ते त्यांना पैसे कसे कमवावे हे शिकवण्यास तयार झाले होते.
रिच डॅड नी पैसे कसे कमवावे या विषयी त्यांना खूप महत्वपूर्ण नियम सांगितले ते आपण आता पाहुयात. रिच डॅड ने त्यांना सांगितलं की तुम्ही किती पैसे कमावता हे महत्त्वाचं नाही महत्त्वाचं हे आहे की तुम्ही किती पैसे तुमच्यासाठी बाजूला काढून ठेवता म्हणजेच सेविंग किती करता. बऱ्याच जणांना हा रुल माहीत नसतो म्हणून आपण नेहमी बघत असतो की लॉटरी जिंकणारा एखादा गरीब किंवा एक मध्यमवर्गीय व्यक्ती जेव्हा श्रीमंत होतो त्यानंतर काही वर्षातच तो पुन्हा त्याच्या गरिबीच्या स्थितीत येतो. लाखो करोडो रुपये मिळून देखील ते त्यांच्या आहे त्या परिस्थिती पुन्हा येतात. त्यांचे म्हणणे असे होते की तुम्ही लाँग टर्म मध्ये किती पैसा कमावता हे महत्त्वाचं नाही तर तुम्ही तुमच्यासाठी किती पैसे बाजूला काढता हे महत्त्वाचं आहे.
आपण हे जरा सविस्तर समजून घेऊयात. पहिला रूल हा आहे की तुम्हाला एसेट्स आणि लियाबिलीटी काय आहे हे माहिती असणे महत्त्वाचे आहे आणि त्यांच्यातील फरक माहिती असणे महत्त्वाचे आहे. रिच डॅड ने त्यांना साध्या भाषेत सांगितले की एसेट्स तुमच्या खिशात पैसे टाकतात तर लियाबिलीटी तुमच्या खिशातले पैसे खर्च करते. जर तुम्हाला श्रीमंत बनायचं असेल तर तुम्हाला एसेट्स घ्याव्या लागतील आणि तुम्हाला एक गरीब किव्वा मध्यमवर्गीय बनून राहायचं असेल तर तुम्ही लियाबिलीटी घ्याव्या लागतील. कोणताही श्रीमंत व्यक्ती उच्च शिक्षित असो किंवा नसतो परंतु तो आर्थिक बाबतीत नक्कीच शिक्षित असतो म्हणजे पैसा कसा काम करतो हे त्याला माहीत असते. आणि पैसा कसा काम करतो हे शाळा किंवा कॉलेज मध्ये शिकवले जात नाही.
प्रत्येक व्यक्तीचा एक इन्कम सोर्स असतो बेलेंसशिट असते आणि कॅश फ्लो असतो. इन्कम स्टेटमेंट मध्ये दोन भाग असतात एक कमाई आणि दुसरा खर्च. इन्कम स्टेटमेंट आपल्याला सांगते की आपण किती पैसे कमावले आणि किती खर्च केले आणि सगळे एक्सपेंसेस काढल्यावर आपल्या समजते की आपल्याकडे किती पैसे शिल्लक आहे किंवा नाही. बेलेंसशिट मध्ये सुद्धा दोन भाग असतात एक एसेट्स आणि दुसरा लियाबिलीटी. तुमची जमीन, घर आणि सर्व गुंतवणूक जे तुम्हाला पैसे मिळवून देतात ते सर्व एसेट्स मध्ये येतात. तर लियाबिलीटी म्हणजे तुमची देनेदारी, घराचे कर्ज, गाडीचे कर्ज, इतर उधारी, क्रेडिट कार्ड हे सगळ लियाबिलीटी येत.
आता समजून घेऊया की गरीब व्यक्ती, मध्यमवर्गीय व्यक्ती आणि श्रीमंत व्यक्तींचा कॅश फलो कसा असतो. आधी गरीब व्यक्ती विषयी जाणून घेऊया. गरीब व्यक्तीचं इन्कम हे त्याचा पगार असतो. त्याचा पूर्ण पगार खाणे, मुलांचे शिक्षण आणि इतर खरचांमधे संपून जातो. बऱ्याचदा महिन्याच्या शेवटी अश्या व्यक्तीकडे पागरातले काहीच शिल्लक राहिलेले नसते. गरीब व्यक्तीचा एसेट्स कोलम नेहमीच रिकामा असतो कारण त्याच्याकडे पागरातल काहीच शिल्लक राहिलेले नसते आणि जरी काही शिल्लक राहिले तरी त्यांना बाचाती विषयी कोणीच काहीच शिकवलेले नसते. ना शाळेत ना कॉलेज मध्ये ना इतर कोणी.
मध्यम वर्गीय व्यक्तीचा कॅश फलो समजून घेऊया. मध्यमवर्गीय व्यक्तींचा एक ठरलेला पॅटर्न असतो. ज्यांचे नुकतच लग्न झालं आहे ते पहिल्यांदा एका भाड्याच्या घरात राहायला जातात नंतर नवीन घर घेण्याचा विचार करतात त्यानंतर फर्निचर घेतात आणि जसे जसे त्यांचे इन्कम वाढत जाईल तस तस ते कार आणि यासारख्या इतर गोष्टी घेण्याचा विचार करत जातात. या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचा लियाबिलीटी कोलम होम लोन, कार लोन आणि क्रेडिट कार्ड लोन नी भरलेला असतो. कर्जाच्या हप्त्यामुळे त्यांचे खर्च वाढतात आणि सर्व पगार अश्या खर्चात निघून जातो. त्यामुळे त्यांचा एसेट्स कोलम नेहमीच रिकामा राहतो.
श्रीमंत लोकांचा कॅश फलो कसा असतो ते बघुया. श्रीमंत लोकांचा खर्च कमी असतो आणि साठवलेले पैसे ते गुंतवणुकीत टाकतात त्यामुळे गुंतवलेल्या पैशातून त्यांना सतत पैसे मिळत राहतात. त्यांचा एसेट्स कोलम नेहमी पूर्ण भरलेला असतो आणि या एसेट्स त्यांना पैसे कमावून देत राहतात. म्हणजेच श्रीमंत लोकं पैशाला पैसे कमावण्यासाठी कामाला लावतात.
रॉबर्ट चे जे गरीब वरील होते त्यांचा पूर्ण पगार खर्च करण्यात संपून जायचा आणि नंतर त्यांच्याकडे एसेट्स खरिदी करण्यासाठी पैसे शिल्लक राहत नव्हते. तर दुसरीकडे त्यांचे श्रीमंत वडील उच्च शिक्षित नसले तरी बऱ्याच वर्षांपासून कमावलेले पैसे एसेट्स घेण्यामध्ये लावत होते. त्यामुळे त्यांचा एसेट्स कोलम लियाबिलीटी कोलम पेक्षा मोठा झाला होता. त्यामुळे त्यांच्या एसेट्स त्यांच्या एक्सपेनसेस पेक्षा जास्त इन्कम तयार करत होत्या. रॉबर्ट चे श्रीमंत वडील जरी शिकलेले नसले तरी त्यांना आर्थिक ज्ञान पूर्ण होते.
गरीब व्यक्ती असो किंवा श्रीमंत व्यक्ती असो पैसे सर्वांना कमावता येतात परंतु ते कसे मॅनेज करावे हे त्यांना माहीत नसते. त्यांना हार्ड वर्क तर करता येते पण पैश्याकडून कसे हार्ड वर्क करून घ्याच हे त्यांना माहीत नसतं. ते फक्त स्वतः काम करत राहतात आपल्या पैश्यांना कामाला लावत नाहीत. जसा जसा त्यांचा पगार वाढतो तसा तसा त्यांचा खर्च देखील वाढत जातो. त्यांना वाटत असते की जेवढं जास्त काम करू तेवढा जास्त पगार वाढत जाईल. जरी त्यांचा पगार कितीही वाढला तरी त्यांच्या आर्थिक समस्या संपत नसतात. त्यांना हे समजत नसते की सर्वात मोठी अडचण ही आहे की ते जे पैसे कमावतात ते कसे खर्च करावे. आणि ही अडचण अर्धिक अज्ञानामुळे आहे.
या सर्वातून पहिली गोष्ट ही समजते की आधी आपण स्वतःसाठी पैसे खर्च केले पाहिजे म्हणजेच जे काही पैसे कमावू ते आधी स्वतःसाठी सेविंग करून ठेवले पाहिजे. त्या साठवलेल्या पैशातून अश्या एसेट्स खरेदी केल्या पाहिजेत ज्या सातत्याने इन्कम देत राहतील. श्रीमंत आणि गरीब लोकांमध्ये हा फरक आहे की मध्यमवर्गीय आणि गरीब लोक आधी सर्व खर्च करून मोकळे होतात आणि उरले तर स्वतःसाठी साठवतात ज्यामुळे ते गुंतवणूक करू शकत नाही तर श्रीमंत लोक आधी स्वतः साठी पैसे बाजूला ठेवतात आणि मग बाकीचे खर्च करतात त्यामुळे ते सातत्याने गुंतवणूक करत राहतात. जेव्हा तुम्ही खर्च करण्यापेक्षा गुंतवणुकीला जास्त महत्त्व देण्यास सूर्वात करसल समजा तुम्ही श्रीमंत होण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे…
ईश्वर वाघमारे













































