नागपूर, २३ फेब्रुवारी २०२४ : हिंदू रिसर्च फाऊंडेशन ही सन २००० पासून राष्ट्रीय स्तरावर काम करणारी मुंबई येथील पंजीबद्ध सार्वजनिक धर्मार्थ संस्था आहे. सदर संस्थेद्वारे विविध स्तरावर चॅरिटेबल कामे सुरू आहेत. प्राचीन काळात भारतातील ज्या ऋषि-मुनिंनी साहित्य, कला व विज्ञान इत्यादि विविध क्षेत्रात अतिशय महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. त्यासंबंधी भारतीय समाज अनभिज्ञ आहे. मागील दोन वर्ष भारतीय संस्कृतीतील अशा सात ऋषींच्या नांवे त्या-त्या क्षेत्रात समस्त मानवकल्याणासाठी निरपेक्ष, निस्वार्थ, अजरामर योगदान व संशोधनाबाबत नोबेल पुरस्काराच्या धर्तीवर सप्त ऋषि पुरस्कार शृंखलाच्या माध्यमाने पुरस्कार देण्याची संकल्पना राबविली आहे.
त्या ऋषि मुनींच्या कार्याची माहिती भारतातील सामान्य व्यक्तीस व नवपिढीस व्हावी या हेतूने त्रैमासिक व्याख्यानमाला सुरू करण्यात येत आहे. पहिल्या सत्राचे व्याख्याते संस्कृतचे प्रख्यात विद्वान व प्राध्यापक श्री मधुसूदन पेन्ना, माजी कुलगुरू, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक, नागपूर हे आहेत. ते महर्षी व्यास – The Social Architect and his contribution in revival of societal values ह्या विषयावर ते बोलणार आहेत.
या त्रैमासिक व्याख्यान मालेचे पाहिले सत्र दिनांक २४ फेब्रुवारी २०२४, शनिवारी सायंकाळी ५ वाजता, मिमोसा हॉल, पहिला माळा, चिटनविस सेंटर, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे आयोजित केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनीधी : नीता सोनवणे