अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राडा

अमरावती, ११ सप्टेंबर २०२२ : राज्यात दुसऱ्या क्रमांकावर श्री शिवाजी शिक्षण संस्था आहे, तर आज या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक सकाळी ८ वाजता पासून चालू झाली. ही मतदान प्रक्रिया चालू असताना मोशी वरुड चे आमदार देवेंद्र भुयार सरळ मतदान केंद्रात जातात पण, त्यांचे मतदान नाही त्यांना मतदान केंद्रात थेट प्रवेश कसा देता असा प्रश्न पॅनलच्या वतीने करण्यात आला आणि नंतर यावर वाद निर्माण झाला.

दोन्ही गट समोरासमोर भिडले आणि पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. तसेच गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी लाठी चार्ज देखील करावा लागला. आमदार देवेंद्र भुयार यांचे मतदान नसतानाही ते मतदान केंद्रात कसे जातात या प्रश्नावरून दोन्ही गटात प्रचंड वाद निर्माण झाला.

तर काही जणांनी मतदान केंद्रात प्रवेश केल्याने वाद जास्त वाढत होता, पण काही वेळानंतर हा वाद आटोक्यात आला आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पहिलीच वेळ आहे जिथं अशा प्रकारे वाद झाला आहे. तर विकास पॅनल आणि प्रगती पॅनल यांची निवडणुक चांगलीच चुरशीची होत आहे. या निवडणुकीत ७७४ अजीवन सभासदांना मतदान करण्याचा अधिकार आहे.

न्यूज प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा