राफेल प्रकरणाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या राफेलच्या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीची गरज नसल्याचे मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केले आहे. तसेच राफेल विरोधातील पुनर्विचार न्यायालयानं फेटाळून लावली.
राफेल प्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना मागितलेली माफी देखील न्यायालयाने मान्य केली आहे. द सॉल्ट कंपनीकडून ही विमाने खरेदी करण्याच्या करारात पूर्वीच्या कराराच्या तुलनेत जास्त रक्कम खर्च झाली आहे. सगळी निर्णय प्रक्रियाच सदोष होती, असा आरोप काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी केला होता.

फ्रान्समधील द सॉल्ट अ‍ॅव्हीएशन कंपनीकडून राफेल जेट विमाने खरेदी करण्याच्या मुद्द्यावर मोदी सरकारला निर्दोषत्व बहाल करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज (गुरूवारी) सुनावणी पार पडली. त्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने ही याचिका आज फेटाळून लावली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा