भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे स्वप्नांमध्ये रमलेला आहे. रहाणेने एक फोटो शेअर केला आहे. त्यात रहाणे झोपलेला असून त्याच्यासमोर गुलाबी चेंडू ठेवलेला दिसतो आहे. त्या फोटोला त्याने ‘मी आतापासूनच गुलाबी चेंडूने खेळल्या जाणाऱ्या ऐतिहासिक कसोटीची स्वप्न बघू लागलो आहे’, असे कॅप्शन दिले आहे. यावर भारताचा सलामीवीर शिखर धवन आणि विराट यांनी भन्नाट रिप्लायदेखील दिले आहेत.
दरम्यान, सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत असताना बांगलादेशचा संघ केवळ १५० धावांवर गारद झाला. यानंतर मयांक अग्रवालचं द्विशतक आणि त्याला इतर फलंदाजांनी दिलेली साथ या जोरावर भारताने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली. भारताने आपला पहिला डाव ४९३ धावांवर घोषित केला. भारतीय संघ शुक्रवारपासून म्हणजेच २२ नोव्हेंबर पासून दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे. हे सामने गुलाबी चेंडूने खेळावे लागतात. त्यामुळे एकीकडे भारतीय संघ आता गुलाबी चेंडूने सराव करत आहे, तर दुसरीकडे भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री हे मंदिरात पूजा-अर्चा करत आहेत