राहुल भोसले यांनी शिवाजी विद्यापीटा तून अर्थशास्त्र विषयातून पी.एच. डी प्राप्त.

फलटण ७ जून २०२३ : फलटण तालुक्यातील पवारवाडी आसू येथील डॉ.राहुल भास्कर भोसले यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापुरने “अर्थशास्त्र” या विषयातील बहुमानाची पी . एच. डी. ही उच्च पदवी प्रदान केली. विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात नोकरी आणि घर-संसार सांभाळत राहीलेल पुढील शिक्षण पुर्ण करण्यासाठी गेली चार-पाच वर्ष अहोरात्र मेहनत केली.

जून २०२२ मधे “अर्थशास्त्र” विषयातील “शोध प्रबंध” शिवाजी विद्यापीठाकडे सादर केला होता.
या “शोधप्रबंधा” ची
१) म्हैसुर विद्यापीठ (कर्नाटक)
२) कलकत्ता विद्यापीठ (पश्चिम बंगाल)
३) डॉ. बाबासाहेब अंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद.

अशा तीन विद्यापीठानी पडताळनी करुन प्रबंधास मान्यता दिली. या तिन्ही विद्यापीठाच्या विभाग प्रमुख/कुलगुरूच्या कमिटी समोर अडीच ते तीन तास या प्रबंधावरील आपले विचार व्यक्त केले. कमीटीने “प्रबंधावरील विचारासही” मान्यता दिली आणि “आपला हा अर्थशास्त्रावरील अभ्यास, शोध आणि विचार ग्रंथ नक्कीच भारतीय अर्थव्यवस्था आणि शैक्षणिक प्रगती मधे मोलाचे कार्य करील.!” असे उदगार काढले.

५ जून २०२३ रोजी कोल्हापुर विद्यापीठाच्या कुलगुरुनी पी.एच. डी, ही पदवी घोषित केली. डॉ. राहुल भोसले यांनी प्रबंधावरिल आपले विचार व्यक्त करताना कमिटी समोर “माझे प्रेरणास्थान, आदर्श आणि मार्गदर्शक “महान अर्थशास्त्री” डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आहेत असेही मत व्यक्त केले.

डॉ. राहुल भास्कर भोसले. त्यांचे मुधोजी महाविद्यालय फलटण येथे पदवीचे शिक्षण घेतले त्यांनी एम ए इकॉनॉमिक्स ची पदवी शिवाजी विद्यापीठातून घेतली. सध्या ते बारामती कृषी खात्यात कृषी सहाय्यक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांनी अर्थशास्त्र विषयातील मिळालेल्या पीएचडी बद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून हार्दिक अभिनंदन होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा