हाथरसला जाण्यापूर्वीच राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वड्रा यांना अटक…

4

नवी दिल्ली, १ ऑक्टोंबर २०२०: हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात कॉंग्रेस पक्षाची आक्रमक भूमिका कायम आहे. गुरुवारी दिल्लीमधून हाथरसकडं रवाना झालेल्या कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांना यूपी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. ग्रेटर नोएडाजवळ यूपी पोलिस आणि कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झटपट झाली, झटापटी दरम्यान राहुल गांधी देखील खाली पडले.

गुरुवारी दुपारच्या दरम्यान काँग्रेसचे हे दोन्ही नेते मंडळी दिल्ली पासून काही अंतरावर ग्रेटर नोएडा इथपर्यंत पोहोचल्यावर पोलिसांनी त्यांना रोखलं. त्यानंतर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा हे दोघंही आपल्या हजारो कार्यकर्त्यांसमवेत हाथरसला रवाना झाले. दरम्यान प्रशासनानं हाथरस सीमेवर बंदी घातलीये आणि कलम १४४ देखील लागू केलाय.

यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियांका गांधी व राहुल गांधी या दोघांनाही अटक केली. ज्या गाडीमधून प्रियांका गांधी वाड्रा व राहुल गांधी यांना नेण्यात येत होतं त्या गाडीभोवती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला. यावेळी पोलीस व कार्यकर्ते यांमध्ये बाचाबाची देखील झाली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा