PFI, RSS वर राहूल गांधींचा हल्लाबोल

16

कर्नाटक, ८ ऑक्टोबर २०२२ : राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सध्या भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा आज कर्नाटकात तुमकुर येथे पोहोचली आहे. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मीडियाशी संवाद साधला आहे. यावेळी दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवर केलेल्या बंदीच्या कारवाईवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाष्य केलं आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही (RSS) भाष्य करत राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे.

RSS वर निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणं आरएसएसनं आणि सावकरकरांनी इंग्रजांना मदतच केली. सावरकरांना तर इंग्रजांकडून पैसे मिळत होते, अशी टीका करतानाच काँग्रेसनेच स्वातंत्र्याची लढाई लढली, असं राहुल गांधी म्हणाले.

यावेळी त्यांनी PFI च्या मुद्द्यावरही भाष्य केलं. द्वेष पसरविणारा व्यक्ती कोण आहे, याने काही फरक पडत नाही. तो कोणत्या समुदायातून येतो याचाही फरक पडत नाही. द्वेष आणि हिंसा पसरविणे हे राष्ट्रविरोधी काम आहे. आम्ही अशा लोकांच्या विरोधात लढू, असं त्यांनी सांगितलं.

नव्या शिक्षण धोरणाला विरोध

नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला आमचा विरोध आहे कारण, हे धोरण आपली मुल्ये आणि देशावर आघार करणार आहे. यामुळं आपल्या इतिहास विकृत होणार आहे. यामुळं काही लोकांच्याच हातात शिक्षणाची ताकद जाणार आहे.

आम्हाला शिक्षण व्यवस्थेचं विकेंद्रीकरण पाहिजे ज्यामध्ये आपली संस्कृती दिसेल. भाजप-संघाला माझे विचार विचलीत करतात माझी चुकीची प्रतिमा उभी करण्यासाठी हजारो कोटी रुपये तसेच शक्तीचा वापर करण्यात आला आहे. माझी उभी करण्यात आलेली प्रतीमा चुकीची आहे. हे काम आगामी काळातही असेच सुरू राहणार आहे, कारण हे करण्यासाठी वापरण्यात येणारे तंत्र आर्थिकदृष्या फार सक्षम आहे, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केलाआहे. तर राहुल गांधी यांच्या या आरोपावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपण्याची चिन्हे दिसत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा