भारत जोडो यात्रेत व्यस्त असूनही राहुल गांधी यांचा संजय राऊत यांना फोन

मुंबई, २१ नोव्हेंबर २०२२ : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज एक ट्विट केलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रात्री आपल्याला फोन करून तब्येतीची विचारपूस केल्याचे संजय राऊत यांनी या ट्विटमध्ये सांगितल आहे.

संजय राऊत यांच्या ट्विटमध्ये ते म्हणतात,”भारत जोडोत व्यस्त असूनही राहुल गांधी यांनी रात्री फोन करून माझ्या प्रकृतीची विचारपूस केली आम्हाला तुमची चिंता होती, असे म्हणाले. राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात ११० दिवस याताना दिल्या, याचे दुःख वाटणे हीच माणुसकी आहे, हा ओलावा संपला आहे, यात्रेत तो दिसतोय.”

यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधींसोबत माझं काय बोलणं झालं. त्यांनी माझी चौकशी केली. जेलमध्ये असताना किती जण आले? माझ्या कुटुंबीयांसोबत कोण उभा राहिलं? राज्यातल्या प्रत्येक पक्षात माझे जुने सहकारी आहेत; पण किती आले? राजकीय मतभेद असले तरी अशावेळी गांधी कुटुंबीयांनी माझी चौकशी केली. आज राहुल गांधी देशभरात फिरतात त्यांच्यात साहेब पण नाहीय, असे मत संजय राऊत यांनी मांडले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. याच दरम्यान राहुल गांधी यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा