राहुल गांधीनी वायनाडमधील आदिवासी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी दिले १७५ स्मार्ट दूरदर्शन संच

वायनाड ,केरळ,२ जुलै २०२० कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन दरम्यान केरळचे मुख्यमंत्री पिनाराय विजयन यांनी सुरू केलेल्या ऑनलाइन वर्गांसाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी वायनाड जिल्ह्यातील कल्पेटा शहरातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी १७५ स्मार्ट दूरदर्शन संच दिले. केटी विक्टर्स चॅनेल व इतर ऑनलाईन यंत्रणेमार्फत कोविड १९ या साथीच्या काळात शाळा बंद केल्यावर केरळ सरकार राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘फर्स्ट बेल’ व्हर्चुल क्लासेस चालवित आहे.

१७५ स्मार्ट टेलिव्हिजन हे राहुल गांधींनी त्यांच्या मतदारसंघात ऑनलाइन वर्गांसाठी विद्यार्थ्यांना पुरेशी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी केलेल्या योगदानाच्या दुसर्‍या टप्प्यातील एक भाग आहे.
राहुल गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आदिवासी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळावे म्हणून ५० दूरदर्शन संच जिल्हा प्रशासनाकडे पुर्वी देण्यात आले होते .

जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आय.सी. बालकृष्णन यांनी कल्पपेटा येथील खासदारांच्या कार्यालयात दूरदर्शनच्या वितरण संबंधित प्रक्रियेचा आढावा घेतला. बाळकृष्णन म्हणाले, “खासदार म्हणून, लॉकडाऊन दरम्यान राहुल गांधींना खूप पाठिंबा मिळाला आहे. १ जून रोजी ऑनलाईन अभ्यास सुरू झाला तेव्हा वायनाडमधील अनेक आदिवासी विद्यार्थी शिक्षणाच्या सोयीअभावी या प्रकल्पातून बाहेर गेले होते.”
“त्यानंतर, राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री आणि वायनाड जिल्हाधिकारी अडीला अब्दुल्ला यांना पत्र लिहिले होते.त्यानंतर जिल्हाधिका-यांनी आदिवासी विद्यार्थ्यांची आवश्यक असणारी आकडेवारी दिली होती. त्यांनी मतदारसंघात प्रत्येकी १०० हून अधिक दूरदर्शन संचाचे वितरण देखील केले आहे.” असे बालकृष्णन म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा