राहुल गांधींनी मच्छिमारांसह समुद्रात मारली उडी, पकडले मासे

केरळ, २५ फेब्रुवरी २०२१: काही दिवसांपूर्वीच काँग्रेस चे नेते राहुल गांधी बिर्याणी बनवताना दिसले होते. त्यांचा हा व्हिडिओ वायरल झाला होता. आता पुन्हा आणखी एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे ज्यात ते मासेमारी करताना दिसत आहेत. केरळ मधील कोल्लम जिल्यातील मासेमारांसोबत राहुल गांधींनी समुद्रात उडी घेतली. यावेळी त्यांनी मासेमारांसोबत गप्पा गोष्टी केल्या आणि नंतर पुन्हा नावेत चढले.

वास्तविक, कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी हे सध्या केरळ दौर्‍यावर आहेत. यावर्षी केरळमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यापूर्वी राहुल गांधी वेगवेगळ्या क्षेत्रांचा दौरा करत आहेत. केरळच्या कोल्लम येथे मच्छिमारांसह समुद्रात गेले असताना राहुल गांधींचे एक वेगळे चित्र बुधवारी पहायला मिळाले.

या दरम्यान राहुल गांधी मासेमारी करताना दिसले. नंतर ते किनाऱ्यावर पोहोचले आणि मासेमारांसोबत गप्पा गोष्टी केल्या. यानंतर त्यांनी मच्छीमारांसह समुद्रात मासेमारीचे जाळे फेकले आणि त्यांच्या बरोबर मासे देखील पकडले.

एवढेच नव्हे तर मच्छीमारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, शेतकरी जमीनीवर शेती करतात तसेच मच्छिमार समुद्रातही तेच काम करतात. केंद्र सरकारमध्ये शेतकर्‍यांसाठी स्वतंत्र मंत्रालय आहे, परंतु आपला आवाज उठवू शकतील अशा मच्छीमारांसाठी स्वतंत्र मंत्रालय नाही.

राहुल गांधी यांनी पुडुचेरीतील मच्छीमारांशी बोलताना हे विधान केले. मात्र, यावर केंद्र सरकारने निशाणा साधला. सध्या राहुल गांधी आधीच आपल्या वक्तव्यामुळे भाजपच्या निशाण्यावर आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा