“राहुल गांधी असं म्हणालेच नाही” – गुलाम नबी आझाद

नवी दिल्ली, २४ ऑगस्ट २०२०: काल दिवसभरात चर्चेत राहिलेली आणि आजही चर्चेत असलेली घटना म्हणजे काल काँग्रेसच्या २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना अध्यक्षपद सोडण्याबाबत पत्र लिहिलं होतं. यावरून आता राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, या २३ नेत्यांनी भाजपला हाताशी घेऊन सोनिया गांधी यांना हे पत्र लिहिलं असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे, अशी चर्चा सुरू होती. याबाबत खुलासा करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे की राहुल गांधींनी असं कोणतंही वक्तव्य केलं नाही.
     
“काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत झालेल्या चर्चेबाबत काही माध्यमांनी चुकीची माहिती दिली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपला हाताशी धरुन काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं, असं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणालेच नाहीत. बैठकीत किंवा बैठकीबाहेर कुठेही त्यांनी अशाप्रकारचं वक्तव्य केलेलं नाही”, असं गुलाम नबी आझाद म्हणाले.
   

” काँग्रेसमध्ये आमच्याच काही सहकाऱ्यांनी असा आरोप केला होता की, भाजपला हाताशी धरून सोनिया गांधी यांना हे पत्र लिहिला गेलं आहे. हे आरोप जर सिद्ध केले गेले तर मी राजीनामा देईन असं म्हणलो होतो.” असे स्पष्टीकरण गुलाब नबी आझाद यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट च्या माध्यमातून दिले आहे.
     
दरम्यान गुलाब नबी आझाद यांच्यावर ओवेसी यांनी चांगलीच सडकून टीका केलेली दिसली. गुलाब नबी आझाद यांनी काँग्रेस बरोबर ४५ वर्ष काम केलं. पण, बदल्यात त्यांना काय मिळालं तर त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी त्यांना भाजप सोबत मिळून कारस्थान करत असल्याचा आरोप केला आहे. आणखीन किती दिवस काँग्रेसची गुलामी करणारअसा सवाल त्यांनी गुलाम नबी आझाद यांना केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा