राजस्थान, दि. १३ जुलै २०२०: सध्या राजस्थान मध्ये राजकारण शिगेला पोचली आहे. अशातच आता उमा भारती यांनी राहुल गांधी यांच्या वर वक्तव्य केले आहे. भाजपच्या नेत्या उमा भारती म्हणाल्या की, राजस्थान मध्ये सध्या जी काही परिस्थिती उद्भवली आहे त्याला राहुल गांधीच जबाबदार आहेत. त्याचप्रमाणे मध्यप्रदेशमध्ये जी स्थिती निर्माण झाली होती त्यासाठी सुद्धा राहुल गांधी जबाबदार आहेत.
राहुल गांधी त्यांच्या पक्षांमध्ये युवा नेत्यांना मोठे होऊन देत नाही. ज्योतिरादित्य शिंदे यांची देखील काँग्रेस पक्षामध्ये घुसमट होण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळेच त्यांनी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता आणि आता पायलट यांची ही स्थिती यापेक्षा काही वेगळी नाही.
राजस्थानमध्ये जेव्हा काँग्रेसची सत्ता आली तेव्हा अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. तेव्हापासूनच सचिन पायलट हे नाराज असल्याचे बोलले जात होते. आता मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपल्यासोबत १०२ आमदार आहेत हा जो दावा केलाय तो चुकीचा आहे असे सचिन पायलट यांनी म्हटलं आहे. माझ्यासोबत २५ आमदार आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राजस्थानमध्ये अस्थिर स्थिती निर्माण झाली आहे. या सगळ्या परिस्थितीला राहुल गांधी जबाबदार आहेत असे आता भाजपाच्या नेत्या उमा भारती यांनी म्हंटले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी