लोकसभेत राहुल गांधीनी मोदी-अदानींचे पोस्टर दाखवत केला ‘हा’ सवाल

नवी दिल्ली, ७ फेब्रुवारी २०२३ : हिंडेनबर्गच्या अदानी समूहाच्या अहवालावरून संसदेत अजूनही गदारोळ सुरुच आहे. लोकसभेत मंगळवारीही विरोधी पक्षांनी अदानी समूह या मुद्यावरुन गदारोळ केला. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांचे फोटो दाखवत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी लोकसभेत गौतम अदानी यांच्यासंदर्भात बोलताना पंतप्रधान मोदी आणि अदानी यांचे नाते काय ? असा सवाल उपस्थित केला. तसेच दोघांचे एकत्र फोटोदेखील दाखवले. मात्र, त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त करत राहुल गांधीना चांगलेच सुनावले. पोस्टरबाजी बंद करा, अन्यथा सत्ताधारी पक्षाचे लोक राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि अदानी यांचे एकत्र फोटो दाखवतील, असा इशारा देखील दिला.

  • नेमके काय म्हणाले राहुल गांधी ? २०१४ मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानी ६०९ व्या क्रमांकावर होते, जादू झाली की नाही माहित नाही पण ते अचानक दुसऱ्या स्थानावर आले. लोकांनी विचारले की हे यश कसे मिळाले? आणि भारताच्या पंतप्रधानांशी त्याचे काय नाते आहे? असे अनेक सवाल उपस्थित होत आहे.

पुढे ते म्हणाले, ‘यात्रेत मला लोकांनी विचारले की अदानीला एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत केली का केली जात आहे. २७ हजार कोटी एसबीआयस, ७ हजार कोटी पीएनबी, ५ हजार कोटी बँक ऑफ बडोदा, ३६ हजार कोटी एलआयसी, ३ कोटी आणि दुसरे पीएसयू बँके खातेदारांचे पैसे अदानीला देण्यात आले आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा