कर्नाटक मध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींचे पावसात भाषण नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : दिनांक ३ ऑक्टोबर २०२२, राहुल गांधी यांनी कन्याकुमारी पासून सुरू केलेली भारत जोडो यात्रा सध्या कर्नाटक राज्यातून मार्गक्रमण करत आहे. भाजपची सत्ता असणाऱ्या कर्नाटक राज्यात काँग्रेसने सुरु केलेल्या भारत जोडो यात्रेला तीन दिवस झाले. काल रविवारी राहुल गांधी यांनी नंजनगुड या ठिकाणी प्रसिद्ध प्राचीन श्रीकांतेश्वर स्वामी मंदिराला भेट दिली.

त्याचबरोबर सायंकाळी गांधी यांनी म्हैसूर येथील एपीएमसी मैदानावर सभेमध्ये भाषण केले केले. भाषणादरम्यान मध्येच जोरदार पाऊस सुरू झाला. तरीही राहुल गांधी यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. यावेळी त्यांनी भाजप आणि आरएसएसवर जोरदार टीका केली. सभेनंतर त्यांनी पावसातच कार्यकर्त्यांच्याही भेटी घेतल्या. राहुल गांधींनी पाऊस सुरू असताना केलेल्या भाषणाचा व्हिडिओ काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

यावेळी ते सांगत होते की भारत जोडो यात्रा कर्नाटकात पोहोचली आहे. नदीच्या प्रवाहाप्रमाणे प्रवास कन्याकुमारी ते काश्मीर असा होणार आहे. भारत जोडो यात्रेमध्ये तुम्हाला हिंसा, द्वेष दिसणार नाही. दिसेल ते फक्त प्रेम आणि बंधुभाव दिसेल. हा प्रवास थांबणार नाही. आता बघा पाऊस येतोय परंतु पाऊसही हा प्रवास थांबवू शकला नाही. उष्णतेचे वादळही सुरू झालेला प्रवास थांबवू शकणार नाही. यावेळी त्यांनी देशात द्वेष पसरवणाऱ्या भाजप आणि आरएसएसच्या विरोधात उभे राहणे हा या यात्रेचा उद्देश असल्याचेही गांधी यांनी सांगितले.

दरम्यान राहुल गांधींनीही आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर पावसातील भाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे, की भारताला एकत्र आणण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. भारताचा आवाज उठवण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रेला कोणीही रोखू शकत नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा