राहुल गांधी यांचे वक्तव्य बेजबाबदारीचे : संबित पात्रा

नवी दिल्ली, दि. १८ जून २०२० : भारतीय जनता पक्षाने (भाजप) काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य केले आहे. भाजप नेते संबित पात्रा म्हणाले की, सैनिकांनी दिलेले हे बलिदान व्यर्थ जाणार नाही देशाच्या एकतेसाठी आम्ही काहीही करण्यास तयार आहोत असे मोदी म्हणाले होते. परंतु राहुल गांधींनी ज्या प्रकारचे वक्तव्य केले आहे त्यामुळे आम्ही दुःखी आहोत. राहुल गांधी ज्या प्रकारे वागत आहेत ते गैर जबाबदारीचे आहे त्याबद्दल देखील आमच्या मनात असंतोष आहे.

संबित पात्रा म्हणाले की, राहुल गांधींनी भारताबद्दल ज्या प्रकारचा अविश्वास दाखविला आहे तो बेजबाबदार आहे, तुम्ही पंतप्रधानांबद्दल केलेले विधान चुकीचे आहे. जेव्हा तुम्ही (राहुल गांधी) पंतप्रधानांवर टीका करता तेव्हा तुम्ही एका व्यक्तीवर नव्हे तर देशावर टीका करत आहात.

राहुल गांधींना संबित पात्रा यांनी विचारले की, आपण देशाला झोपलेला असे संबोधत आहात का, सीमेवरती वीस जवानांनी देशासाठी आपले प्राण दिले आहेत, आपण म्हणत आहात की भारताने आपल्या सैनिकांना निशस्त्र सोडले आहे, जर आपल्याकडे पूर्ण माहिती नसेल तर ते वाचा. २००८ मध्ये काँग्रेस आणि चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने या करारावर स्वाक्षरी केली. ( प्रत्यक्ष सीमारेषेवर २००८ मध्ये असा करार करण्यात आला होता की भारत आणि चीन या उभय देशांमधील सैन्य जेव्हा प्रत्यक्ष सीमारेषेवर असेल त्यावेळेस कोणत्याही प्रकारची युद्धसामग्री सैन्य बाळगणार नाहीत )

चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग आणि काँग्रेसचे अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या झाल्याचे संबित पात्रा यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय व स्थानिक विषयांवर हे दोन्ही पक्ष एकमेकांवर चर्चा करतील असे पक्षपातळीवर झाले. राहुल गांधी या कराराबद्दल का बोलत नाहीत?

राहुल गांधी काय म्हणाले?

चीन सीमा वादावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. गुरुवारी राहुल गांधींनी एक व्हिडिओ संदेश प्रसिद्ध केला ज्यामध्ये त्यांनी असा सवाल केला की चीनने आपल्या निशस्त्र सैनिकांना मारले याला जबाबदार कोण आहे?

राहुल गांधींनी आपल्या व्हिडीओ संदेशात म्हटले आहे की, ” चिनी सैन्याने भारताच्या निशस्त्र सैनिकांना ठार मारून मोठा गुन्हा केला आहे, या सैनिकांना बिना युद्धसामग्रीचे संकटाच्या दिशेने कोणी पाठवले? का पाठवले? या सर्वाला जबाबदार कोण?

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा