रायगडावरील मेघडंबरीचे शिल्पकार मनमोहनदादा खानविलकर यांचे निधन

कोल्हापूर, दि. १२ जून २०२०: रायगड किल्ल्यावरील मेघडंबरीचे शिल्पकार मनमोहनदादा खानविलकर यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचे निधन झाले आहे. रायगडावरील मेघडंबरी बनवण्याचे काम त्यांच्याकडे सोपविण्यात आले होते. १९८२ मध्ये हे काम सुरू करण्यात आले होते. मेघडंबरीचे सुरु झालेले हे काम पूर्ण करण्यासाठी तब्बल दोन वर्षांचा कालावधी लागला. १९८४ मेघडंबरी पूर्ण बनून तयार झाली होती.

कशी घडवली मेघडंबरी

खानविलकर यांनी किल्ले रायगड येथील सिहांसनावरील बनविलेली मेघडंबरी ही तब्बल ६ टन वजनाची आहे, त्यात २ टन स्टील आणि ४ टन ब्रॉंझ तसेच तांबे, शिसं , जस्त, कथिल यांचा वापर केला आहे. १९८२ मधे सुरु झालेले हे काम मे १९८४ मध्ये पूर्ण झाले. एकसंध दिसणारी मेघडंबरी ही १३० तुकडे एकत्र जोडून अखेर एप्रिल १९८५ मधे रायगड येथे खऱ्या अर्थाने पूर्ण झाली. तेव्हा त्यात पुतळा नव्हता, तो नंतर बसवण्यात आला. त्यावेळी या मेघडंबरीवर असलेली झालर, शिक्के या गोष्टी नंतर लोकांनी काढून नेल्या. शिवाजी महाराजांचं सिंहासन त्या जागी होतं, म्हणून ती जागा मेघडंबरी बसवण्यासाठी निवडण्यात आली असावी.

या मेघडंबरीचे शिल्पकार खानविलकर यांचा तत्कालीन राष्ट्रपती श्री. ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या कामाचे कौतुक ही करण्यात आले. नुकतेच २०१९ मधे किल्ले रायगड येथे पार पडलेल्या शिवपुण्यतिथी अभिवादनाच्या कार्यक्रमावेळी खानविलकर हे प्रमुख पाहुणे होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा