शेती विधेयकांच्या विरोधात शेतकऱ्यांचे ‘रेल्वे रोको’ आंदोलन

पंजाब, २४ सप्टेंबर २०२०: शेतकरी आता कृषी विधेयकाविरोधात आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहेत. रस्त्यावरील चक्का जामसह गाड्या थांबविण्याची घोषणा शेतकऱ्यांनी केलीय. फिरोजपूर रेल्वे विभागानं २४ सप्टेंबर रोजी सकाळी ६ ते २६ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजता एहतिहातन अमृतसर दरम्यान धावणाऱ्या सर्व १४ विशेष गाड्या रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळी कृषी विधेयकाचा निषेध करण्यासाठी शेतकरी बरनाळ्यात रस्त्यावर उतरले. तसेच त्यांनी दुकानदारांना दुकानं बंद करण्याचं आवाहन केल. काँग्रेस, अकाली दल, आम आदमी पार्टी यांच्यासह विविध संघटना शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पुढे आल्यात. त्यानंतर शेतक्यांनी रेल्वे रुळावर तंबू ठोकले आणि तिथेच धरणे आंदोलनाला सुरुवात केलीय.

पटियालाच्या नाभा येथे रेल्वे ओव्हर ब्रिजखाली भारतीय शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यास शेतकरी बसले आहेत. शेतीविषयक आलेली नवीन विधेयकं शेतकऱ्यांचा बळी घेतील असं शेतकरी म्हणाले. नाभा डीएसपी राजेश छिब्बर यांनी शेतकऱ्यांची बोलण्यासाठी संपर्क साधला आहे.

अमृतसरमधील किसान मजदूर संघर्ष समितीशी संबंधित कामगार आज सकाळपासूनच रेल्वे रुळावर बसले आहेत. शेतकर्‍यांनी ‘रेल रोको’ आंदोलन सुरू केलं आहे. ‘रेल रोको’ मोहीम २६ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार असल्याचं समितीच्या सदस्यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांचे हे आंदोलन पंजाब मध्येच जास्त का बघण्यास मिळत आहे तर याचं कारण असं की, पंजाब शेतीच्या बाबतीत अग्रेसर राज्य आहे. देशातील शेती उत्पादनात पंजाबचा मोठा वाटा असतो. नरेंद्र मोदी सरकारनं कृषी क्षेत्राशी संबंधित ३ नवीन विधेयकं संसदेत मंजूर केली आहेत. यामुळं देशातल्या पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील शेतकरी आंदोलन करताना दिसून येत आहे. असं असलं तरी महाराष्ट्रात मात्र विधेयकांविरोधात शेतकरी आंदोलनं होताना दिसत नाहीयेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा