आज पासून संपूर्ण पंजाब मध्ये शेतकऱ्यांचं रेल्वे रोको आंदोलन

7

अमृतसर, १ ऑक्टोंबर २०२०: यंदाच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने शेतकरी विषयक तीन विधायक मंजूर केली होती यानंतर राष्ट्रपतींनी देखील यावर आपली मोहोर उमटवत त्याचं कायद्यात रुपांतर केलं. संसदेत हे विधायक आल्यानंतर शेतकऱ्यांकडून या विधेयकांना विरोध करण्यात आला. शेतकऱ्यांबरोबरच विरोधी पक्षाने देखील या विधेयकाविरोधात निदर्शनं केली. संपूर्ण देशातून विविध शेतकरी संघटनांनी देखिली या विधेयकांना विरोध केला. मात्र आता या विधेयकांचं कायद्यात रूपांतर झालं आहे. तरीदेखील पंजाब हरियाणा यांसारख्या भागातून या कायद्याला विरोध होताना दिसतोय.

अमृतसर येथील जांडियला गुरू क्षेत्रातील गाव देवीदासपुरा येथे बुधवारी देखील शेतकरी रेल्वे रुळावर बसले होते व आपलं आंदोलन कायम ठेवलं होतं. देवीदासपुरा गावात शेतकऱ्यांच्या धरणा आंदोलनाचा काल सातवा दिवस होता. आज गुरुवार १ ऑक्टोंबर पासून पूर्ण पंजाब मध्ये शेतकऱ्यांकडून ‘रेल रोको’ आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. यादरम्यान शेतकरी रेल्वे रूळावर धरणे आंदोलन करणार आहेत व रेल्वे रुळावरच बसून राहणार आहे. त्यामुळं रेल्वेच्या दळणवळणात मोठी अडचण निर्माण होणार आहे. यासह रेल्वेतील प्रवाशांना देखील याचा मोठा त्रास सहन करावा लागणार. तसेच रेल्वेचं देखील यातून नुकसान होणार आहे. हे पाहता रेल्वेनं देखील पंजाब मधील रेल्वे कालपासून बंद ठेवण्याचे आदेश दिलेत.

अमृतसरच्या देवीदासपुरा गावात ‘किसान मजदूर संघर्ष समिती’चं रेल्वे रुळावर आंदोलन बुधवारी सातव्या दिवशीही कायम होतं. काल खासगी कंपन्यांची पोस्टर्स जाळून शेतकर्‍यांनी रोष व्यक्त केला आणि केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. आज, पंजाबमध्ये शेतकरी ‘रेल्वे रोको आंदोलन’ सुरू करतील. शेतकरी संघटनांनी यासाठी तयारी सुरू केलीय. रेल्वे रुळांवर धरणे आंदोलन होणार असून संपूर्ण पंजाबमध्ये गाड्या थांबविण्यात येणार असल्याचं शेतकरी संघटनांचं म्हणणं आहे. हे रेल्वे रोको आंदोलन ५ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. यापूर्वी २४ ते २६ सप्टेंबर या कालावधीत शेतकऱ्यांनी रेल्वे रोको आंदोलन केलं होतं.

तर दुसरीकडं शेतकऱ्यांचं हे आंदोलन पाहता रेल्वे प्रशासनानं पंजाब मध्ये रेल्वे चालवण्यास काल आणि आज बंदी दिलीय. अर्थात रेल्वे गाड्या धावणार तर आहेत परंतु, त्या पंजाबच्या सिमे मध्ये प्रवेश करणार नाहीत. रेल्वे गाड्या हरियाणातील अंबाला स्टेशन पर्यंतच चालवल्या जातील. यामुळं रेल्वे गाड्या अंबाला पासून ते अमृतसर सह पंजाब मधील इतर ट्रॅकवर धावताना दिसणार नाहीत. यामुळं बाहेरून पंजाब मध्ये येणाऱ्या किंवा पंजाब मधील नागरिकांना प्रवासा संदर्भात समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे. रेल्वेकडून यासंदर्भात संबंधित प्रवाशांना तिकिटाचे पैसे परत दिले जातील. यासाठी आयआरसीटीसी साइट आणि रेल्वे स्टेशन काउंटरवर प्रवासी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

या रेल्वेगाड्या रातील बंद

अमृतसर हरिद्वार एक्सप्रेस ०२०५४-५३ आणि नवी दिल्ली जम्मूतवी राजधानी एक्सप्रेस ०२४२५-२५ रेल्वे ३० सप्टेंबर पासून थांबवण्यात आलीय. मुंबई सेंट्रल-अमृतसर एक्स्प्रेस ०२९०४ ही रेल्वे गाडी फक्त अंबाला पर्यंतच जाईल. अमृतसर जयनगर एक्स्प्रेस ०४६५०, जम्मूतवी बांद्रा टर्मिनस एक्सप्रेस ००९०२ अंबाला ते अमृतसर दरम्यान ३० सप्टेंबरला रद्द करण्यात आलीय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा