पावसाने लावली पुण्यातील काही भागात हजेरी

पुणे, दि. २९ जून २०२०: सध्या मान्सून काळ सुरू झाला असला तरी राज्याच्या बऱ्याच ठिकाणी पावसाने अजूनही दडी मारलेली दिसत आहे. या सर्वांमध्ये आज पुणेकरांना मात्र दिलासा मिळाला आहे. शहराच्या काही भागांमध्ये तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बघण्यास मिळाल्या.

पुणे शहरात काल दुपारनंतर पावसाचे दमदार आगमन झाले असून, आज (२९ जून) मेघगर्जनेसह मध्य स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे. या अंदाजानुसार पुण्यामध्ये आज दुपारी काही ठिकाणी पाऊस बघण्यास मिळाला. आज एक वाजल्यापासूनच पुण्यामध्ये ढगाळ वातावरण झाले होते.

राज्यातील बहुतांश भागात या महिन्याच्या सुरुवातीला पावसाचे दमदार आगमन झाले. मात्र, मागील काही दिवसात विश्रांती घेतलेला पाऊस आता गोव्यासह महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार बरसणार असल्याचा अंदाज आज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा