कर्जत तालुक्यात पावसाची रिमझिम

कर्जत, दि.१३मे २०२०: कर्जत तालुक्यात दिवसभर तापमानाचा पारा ४२ च्या घरात गेला होता. जोरदार वाऱ्याने सुरुवात करत रिमझिम पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी वर्गाची एकच धांदल उडाली. शेतकरी हा जमेल तसे काढलेले पिक वाचवण्यासाठी आपल्या शेतात धाव घेताना पाहण्यास मिळाला.

जनावरांचा चारा तसेच अन्न धान्य ,कांदा, आदीचे पावसापासून रक्षण करण्यासाठी ते झाकण्याची लगबग सुरू होती. सुसाट वारा सुरू झाल्यापासून विजेने नेहमीप्रमाणे रजा घेऊन आपले कर्तव्य पार पाडले होते. वादळी वारे हळुवार पावसाने हजेरी लावल्याने वातावरण थंड झाले होते.तर आपल्या शेतातील काही नुकसान तर झाले नसेल ना या धास्तीने शेतकऱ्यांचे वातावरण मात्र तापले होते.

कर्जत मध्ये सिध्दटेक, जलालपूर, भांबोरा, शेडगाव फाटा हळुवार पावसाची रिमझिम सरीची परिस्थिती पाहण्यास मिळाली. त्यामुळे कर्जत तालुक्यातील शेतकऱ्याचे डाळींब, द्राक्षे, पावसाळी बाजरी, कांदा पिकांचे फार मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा