माढा तालुक्यात पावसाचा हाहाकार

माढा, १५ ऑक्टोबर २०२०: राज्यात परतीच्या पावसामुळे अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. माढा, कुर्डुवाडी शहर आणि तालुक्यात पावसाचा तडाखा बसला आहे. बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी भरलं आहे. उजनी धरणातून भीमानदीला नदीपात्रात पाण्याचा २५०००० क्यूसेक विसर्ग सुरु करण्यात आला होता. हा विसर्ग इतका मोठा होता की, नदीकाठच्या गावालगत असलेल्या नागरिक व गावातील झोपडपट्टी मध्ये पाणी शिरले. तत्काळ रातोरात तेथील नागरिकांना स्थलांतरित केल्यामुळे जीवित हानी ठळली असून, जिवाच्या भीतीने हातात सापडेल ते घेऊन सैरावैरा अंधारात धावताना पाहायला मिळत होते. घरातील सर्व वस्तूचे मात्र मोठ्या प्रमाणात नासधूस झाली असून, अन्न धान्य भिजले आहे.

रात्री उजनी धरणातील पाण्याचा विसर्ग ऐवढा मोठा होता की येणारे छोटे मोठे नाले, नद्या, ओढे, अशा अनेक पाण्याचा विसर्ग धरण व भीमानदीला मिळत होते. यामुळे उजनीचा विसर्ग वाढवण्यात आला असून या नदीकाठच्या व खालच्या आलेगाव, रूई, चांदज, टाकळी, वडोली, नगोर्ली, सुरली, अकोले, वेनेगाव, शेवरे भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पिक पाण्याबरोबर वाहून गेले असून, ऊस, कांदे, तूर, यासारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून वस्तीत ठेवलेले हजारो रुपयांचे खते भिजून पाणी झाले आहे. शेताचे विद्युत मोटारी पाईप, वाहून गेले आहेत. अनेक गावांमध्ये मोबाईल नेटवर्क अद्यापही गुल झाले असून, विद्युत लाईटचा खांब काही ठिकाणी तुटलेले असल्याने विजेचा अजून ही पत्ता नाही.

पुणे सोलापूर रोडवरती वाहनांच्या रागांच रांगा लागल्या होत्या. महामार्गावर पुणे सोलापूर रोडवरती भिगवण येथे धरणाचे पाणी ओरफ्लो होऊन पाणी रस्त्यावर आले होते तर बेंबळे येथे नदीचे ओढा, व शेतातील पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने टेंभुर्णी बेंबळे रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. माढा तालुक्यांत बुधवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे पुराचा मोठा तडाखा बसला. अनेक रस्ते, पूल पाण्याखाली गेले, घरांमध्येही पाणी शिरले. त्याचमुळे तालुक्यातील प्रत्येक भागातील रस्ते वाहतूक ठप्प झाली होती. परिस्थिती नियंत्रणात आली की, प्रशासनाला तातडीने पंचनाम्याचे आदेश देण्यासाठी व नुकसान भरपाईसाठीचे प्रयत्न करू असेही आमदार बबनराव शिंदे म्हणाले. व पूरग्रस्तांना जेवण व राहण्याची व्यवस्था गावातील शाळा मध्ये करून त्याना जेवण, चहा, नाष्टाची व्यवस्था करण्यात आली आहे.

उजनी धरण ओव्हर फ्लो झाले असून, पाण्याचा प्रवाह वाढत आहे. विशेष म्हणजे, आणखीन दोन-तीन दिवस पावसाची शक्यता असल्याने माढा तालुक्यातील सर्व नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा तहसीलदार यांच्याकडून देण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी-प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा