चैन्नई मध्ये पावसाचा हाहाकार;दोघांचा मृत्यु,तर शाळा कॉलेज बंद,

6

चैन्नई,२ नोव्हेंबर २०२२: चैन्नई मध्ये काल पासून पावसाचा कहर चालु आहे. या पावसामुळे एका ४५ वर्षीय महिलेचा आणि ५५ वर्षीय व्यक्तीचा वीज पडून मृत्यु झाला तर अजून पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा आंदाज हवामान खात्याकडून सांगण्यात आला आहे.

मंगळवार पासून पडत असलेल्या पावसाची नोंद ८.४ सेमी इतकी झाली आहे. ज्यामुळे शहरामध्ये ३० वर्षीतील सर्वाधिक पाऊस पडला असल्याचे सांगितले जात आहे. तामिळनाडूची राजधानी आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाने झोडपले. रात्रभर पाऊस पडत असल्याने रस्ते जलमय झाले .

अनेक भागांमध्ये रस्त्यावरील पावसामुळे सर्व वाहतुक विस्कळीत झाली , तर काही ठिकाणी झाडे पडल्याने वाहतूक कोंडी झाली, यामुळे आपत्कालीन स्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने सर्व यंत्रना सज्ज ठेवल्या आहेत. अतिवृष्टीमुळे चैन्नई, रानीपेठ आणि तिरुवल्लूर येथील शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत .

तर वेल्लोर, कांजीपुरम, विलुपुरम आणि चेंगलपट्ट येथील शाळा बंद राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले . गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने चैन्नई शहराला पुरांचे स्वरुप आले असून नागरिकांना संतर्क राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा