उरुळीकांचन, दि. १७ मे २०२०: उरळीकांचन येथे पूर्व हवेली गावातील उरुळीकांचन, लोणी काळभोर, थेऊर, तरडे, सोरतापडी, शिंदवणे, या गावांना शनिवारी (दि. १६) रोजी रात्री ९ ते १० एकतास वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. सुमारे एक तास पाऊस पडत होता. रात्री सात वाजल्यापासूनच सोसाट्याचा वारा सुटला. वादळी वाऱ्याने रस्त्यालगतची झाडे तुटून रस्त्यावर पडले. गावातील वाड्या-वस्त्या वरील अनेक घरांचे नुकसान झाले.
सोसाट्याच्या वाऱ्यापाठोपाठ पावसाने सुरुवात केली. सुमारे एक ते दोन तास पाऊस पडत होता. अवकाळी पावसाचा तडाखा व पूर्व हवेली तालुक्यातील गावांना बसला आहे. हा पाऊस दिलासा देण्याऐवजी नुकसानकारक ठरत आहे. प्रचंड वादळी वारे व वीजांच्या कडकडाटामुळे भितीदायक स्थिती निर्माण झाली होती. मात्र वाऱ्याचा वेग कमी झाल्याने जोरदार पावसाच्या सरी बसरसल्याने रस्त्यावर सर्वत्र पाणी साचले होते.
या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात फाटका बसत आहे. सध्या शेतात असणाऱ्या डाळिंबाच्या बागा, टोमॅटोचे फड, भाजीपाला, तसेच शेतकऱ्यांच्या आवडीचे ऊस पीकही भुईसपाट झाले. पावसाळा सुरू होण्या आधीची ही पिके भुईसपाट झाली आहे. जर असाच पाऊस पडत राहिला तर शेतकऱ्यांना आपली राहिलेली कामे करता येणार नाही. अशी व्यथा पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांनी “न्यूज अनकट” शी बोलताना केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे