उरुळी कांचन १९ ऑक्टोबर २०२० :वळती येथे रविवारी सायंकाळी ढगफुटीसह पाऊस झाला यावेळी पाऊण तास पावसाने हजेरी लावली त्यामुळे गावच्या वरील तीन नाले फुटून शिवारात पाणी वाहू लागले आहे.
गावांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी असणाऱ्या तलावांवरून पहिल्यांदाच पाणी वाहत होते व पाण्यामुळे शेतीचे मोठे नुसकान झाले आहे. बांध फोडून पिके वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. काही शेतकऱ्यांचा काढणीला आलेला भाजीपालाही व इतर पिकांचेही नुकसान झाले आहे.
घटनास्थळी मंडलाधिकारी दीपक चव्हाण, पोलीस प्रशासन, पोलीस पाटील, कृषी सहाय्यक यांनी पाहणी करून तहसीलदार सुनील कोळी, यांना माहिती दिल्याचे मंडल अधिकारी चव्हाण यांनी बोलताना सांगितले आहे.
वळती परिसरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या आधी असा पाऊस कधीच पाहिला नव्हता ढगफुटी काय असते तेही पाहायला मिळाले नाही असे बोलताना स्थानिक शेतकरी जयसिंग कुंजीर यांनी सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे