गोंडा, २५ जुलै २०२० : गुन्हेगारी साम्राज्याचे गड असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये आपहरण,खंडणी,खून असे प्रकार रोज घडत असतात.मात्र या घटनेवर उत्तर प्रदेश पोलिसांकडून लगेच प्रकरणाचा छडा लावून आरोपींना गजाआड करण्याचे जे कार्य केले त्यामुळे पोलिसांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे .
हे प्रकरण गोंडा जिल्ह्यातील आहे, जेथे मास्क वाटण्याच्या बहाण्याने एका व्यावसायिकाच्या नातवाचे अपहरण करण्यात आले. पोलिसांनी काही तासांतच मुलाची सुटकाच केली नाही तर , आरोपींच्या मुसक्या देखील आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सूरज पांडे, उमेश यादव, दीपू कश्यप आणि अन्य एकाचा समावेश आहे. छावी पांडे नावाची एक महिला देखील यामध्ये आहे. २४ तारखेची हि घटना आसून आरोपी हे मास्क वाटण्याच्या कारणाने त्या भागात दाखल झाले आणि ६ वर्षाच्या मुलाला तेथून पळवले त्या नंतर त्यांनी ४ कोटीची रक्कम मुलाला सोडविण्यासाठी मागितली. आरोपी त्या मुलाला घेऊन हे शहर सोडण्याच्या विचारात होते.पोलिसांनी आपली सतर्कता दाखवत वेळीच नाकेबंदी लावली ज्यामधे यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.
आरोपींनी केला फोन….
“तुझ्या मुलाचे अपहरण झाले आहे. चार कोटी रुपये व्यवस्था करा. आम्ही संध्याकाळपर्यंत कॉल करू. फक्त उत्तर द्या होय किंवा नाही. आणि जर तुम्ही काही हालचाली केल्या तर ते आम्हाला लगेच कळेल. आणि कानपूर मॅटर बद्दल तुम्ही ऐकलं असेलच. विकास दुबेचे मॅटर कोणाबरोबर आहे आणि कोणास पाठिंबा आहे हे आपणास समजेल. म्हणून तुम्हाला पोलिसांकडे जाण्याची गरज नाही. आम्ही २-३ तासात फोन करू. उत्तर होय किंवा नाही आहे. आणि जर तुम्ही काही पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला तर आपण त्या मुलाची आशा सोडून द्या.”असे अपहरण कर्ता म्हणाले मुलाचे वडील अपहरणकर्त्यांना वारंवार सांगत होते की मुलाला फक्त सुरक्षित ठेवा, ते कोणतीही कारवाई करणार नाही.
पोलिसांची दमदार कामगिरी….
यूपीचे एडीजी (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी सांगितले की अपहरणकर्त्याने मुलाला गाडीतून इतरत्र नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना पकडले. पोलिसांच्या कारवाईत दोन बदमाशही जखमी झाले आहेत. त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि दोन पिस्तूल जप्त करण्यात आल्या आहेत.त्याचबरोबर हे प्रकरण त्वरित व काटेकोरपणे सोडविल्याबद्दल सरकारने एक लाख रुपयांचे बक्षीस स्थानिक पोलिस आणि एसटीएफला जाहीर केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी
Mall lavkar open kra.
Balatkar karnaryla lavkr fashi dyavi 8 varsh lau naye