राज कुंद्रा याला १९ जुलै २०२१ रोजी पोर्नोग्राफीच्या गुन्ह्याअंतर्गत अटक करण्यात आली असून त्यानुसार पौर्नोग्राफीच्या थरारनाट्याचा एका अंकाचा पडदा वर गेला. राज कुंद्राला पोर्नोग्राफीच्या गुन्ह्याअंतर्गत १९ जुलैला मुंबई क्राईम ब्रांचने अटक केली.
हे प्रकरण नक्की आहे काय?
फेब्रुवारी महिन्यात राज कुंद्रा यांच्याविरोधात अश्लील व्हिडीयो तयार करुन तो एपच्या माध्यमातून प्रसारीत केल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानुसार गहना वशिष्ठ, उमेश कामत, दीपंकर खासनवीस यांना बेड्या ठोकल्या होत्या. दीपंकर हा राज कुंद्राबरोबर सहसंचालक असून त्याने हॉट-हीट ही वेबसाईट तयार करुन त्याद्वारे अश्लील व्हिडीयो पाठवत असे. उमेश कामत पोलिसांच्या हाती आल्यानंतर राज कुंद्राला अटक झाली. कारण उमेश कामत हा राज कुंद्रांचा माजी पीए असून केनरीन इंटस्ट्रीजचा भारताचा प्रतिनिधी होता. त्याला अटक केली असून राज कुंद्राला २७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे राज कुंद्राच्या या व्यवसायाचा पसारा यूकेमध्येही पसरला आहे. याचे कारण केनरीन प्रायव्हेट कंपनी. राज कुंद्राचे नातेवाईक प्रकाश बक्षी हे युके स्थित केनरीन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये राज कुंद्राबरोबर भागीदार आहेत. यात पोर्नोगार्फीचे अनेक संदर्भ समोर आले.त्याचबरोबर राज कुंद्राच्या विहान इंडस्ट्रीज कंपनीचा आयटी हेट रायन थोरोपे यालाही पोलिस कोठडी सुनावली आहे. याच व्यवसायाची पाळंमूळ शोधण्यासाठी राज कुंद्राची पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्रा हीचीदेखील चौकशी करण्यात येत आहेत. त्याचबरोबर त्याच्या जूहू इथल्या घराचीही क्राईम ब्रांचकडून तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या घरात सर्व्हर आणि ९० व्हिडीओ सापडले. मात्र या संदर्भात त्याला विचारले असता त्याने सांगितले की इतर ओटीटी प्लॅटफॉर्मप्रमाणेच बोल्ड कंटेट तयार करत असल्याचं त्याने सांगितलं. पण हे सत्य नसून हे सर्व अश्लील व्हिडिओ असून त्याचे शूटींग भारतात होत असून ते नंतर वी-ट्रान्सफर द्वारे युकेला पाठवले जात होते. आपली अटक बेकायदेशीर असून लवकर सुटका होण्यासाठी राज कुंद्राने हाय कोर्टात धाव घेतली आहे.
नक्की काय करत होता राज कुंद्रा?
राज कुंद्रा हा नवोदित महिला कलाकारांना वेबसिरीज किंवा मालिकेत काम मिळवून देतो, असं सांगून अमिष दाखवत असे. त्यामध्ये अश्लील व्हिडीओ शूट करुन ते व्हिडीओ पाठवले जायचे. यात न्यूड आणि सेमी न्यूड सीन्स शूट केले जायचे. यात अभिनेत्री गहना वशिष्ठ, शर्लिन चोप्रा अशा अनेक अभिनेत्रींची नावे घ्यावी लागतील. राज कुंद्राने एका ट्विटद्वारे सांगितले होते की, भारतात अभिनेते क्रिकेट खेळत आहे. क्रिकेटर राजकारणात येत आहे. तर राजकारणी पोर्न पहात आहे आणि पोर्न स्टार अभिनयाच्या क्षेत्रात येत आहेत.नुकतचं हे ट्विट क्राईम ब्रांचच्या हाती लागले असून आता त्यामुळे खळबळ उडाली आहे.
मुंबई पोलिसांच्या रडारवर राज कुंद्राची पत्नी शिल्पा शेट्टी असून आता कुणाकुणाची चौकशी होणार हे पहावं लागेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस