राज कुंद्राची सीबीआयकडे तक्रार, मुंबई पोलिसांवर लावले अत्यंत गंभीर आरोप

मुंबई, ३० सप्टेंबर २०२२ : पॉर्नग्राफी फिल्म निर्मिती प्रकरणी जामिनावर असलेला बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडे (CBI) तक्रार दाखल केली आहे. त्यांनी त्यात मुंबई गुन्हे शाखाच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आपल्याला पॉर्नग्राफी प्रकरणात गोवले असल्याचा दावा आपल्या तक्रारीत केला आहे. राज कुंद्राने आपल्या तक्रारीत असेही दावा केला आहे की, एका व्यावसायिकाने वैयक्तिक सूडबुद्धीने त्याच्याविरुद्ध संपूर्ण खटला रचला होता. तसेच या खटल्यातील प्रत्येक साक्षीदारावर आपल्याविरूद्ध साक्ष देण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता, असं तक्रारीत म्हटलं आहे.

पॉर्नग्राफी प्रकरणात आपल्याला चुकीच्या पद्धतीने अडकवण्यात आल्यामुळे या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुन्हाची पुन्हा सीबीआय चौकशी करण्यात यावी. आणि आपल्याला न्याय द्यावा अशी मागणी कुंद्रा यांनी केली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण कोणतं नवं वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान पॉर्नग्राफी रॅकेट चालवण्याप्रकरणी राज कुंद्राला १९ जुलै रोजी त्याचा सहकारी रायन थॉपसह अटक करण्यात आली होती. काही दिवसापूर्वीच राज कुंद्राने पॉर्नग्राफी प्रकरणी किला कोर्टात डिस्चार्ज अर्ज दाखल केला होता. त्यावर उत्तर देताना गुन्हे शाखेने कुंद्राच्या अर्जाला विरोध करत त्याच्याविरुद्ध अनेक पुरावे असल्याचे सांगितलं आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा